chandrapur news Saam tv
महाराष्ट्र

Chandarpur Crime : चंद्रपूर जिल्हा हादरला; कापड दुकानात गोळीबार, कामगार जखमी

Chandrapur News : सुरवातीला एका हल्लेखोराने दुकानाच्या प्रवेश द्वाराजवळ बॉम्ब टाकला व इतर दोन साथीदारांनी दुकानाच्या आत प्रवेश करून गोळीबार केला

संजय तुमराम

चंद्रपूर : दोन दिवसापूर्वी चंद्रपूर शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे गोळीबार झाला होता. या गोळीबारात मनसे कामगार सेनेचा जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार जखमी झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज बल्लारपूर शहरातील गांधी चौक येथे कापड दुकानात पेट्रोल बॉम्ब टाकून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दुकानातील कामगार जखमी झाला आहे. सलग दुसऱ्या गोळीबाराच्या घटनेने जिल्हा हादरला आहे. 

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील एका कापड दुकानात हा गोळीबार करण्यात आला. या दुकानात काम करणारा कार्तिक साखरकर (वय ३२, रा.राणी लक्ष्मी वार्ड बल्लारपूर) हा कामगार जखमी झाला आहे. मास्क आणि टोपी घातलेले तीन हल्लेखोर एका दुचाकीने आले होते. सुरवातीला एका हल्लेखोराने दुकानाच्या प्रवेश द्वाराजवळ बॉम्ब टाकला व इतर दोन साथीदारांनी दुकानाच्या आत प्रवेश करून गोळीबार केला. सुदैवाने या हल्यात दुकानातील ईतर कामगार सुखरूप आहेत. हा हल्ला (Crime News) दुकानमालक सुरेश मालू आणि सुनील मालू यांच्यावर करण्याचा बेत असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. 

वर्षभरापूर्वीच्या घटनेशी संबंध?

वर्षभरापूर्वी याच दुकानाला आग लावण्यात आली होती. यामध्ये हे दुकान जळून राख झाले होते. पोलिस तपासात जुन्या घटनेतील आरोपी अद्याप मिळू शकले नाही. यातील संशयित सूरज गुप्ता मागील वर्षभरापासून फरार आहे. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. वर्षभरापूर्वीच्या घटनेचा आजच्या गोळीबाराशी संबंध आहे का, याबाबत पोलिस तपास करत आहेत. कोळसा, रेल्वे जंक्शन, बांबू व इतर उद्योगामुळे बल्लारपूर शहरात मोठ्या संख्येत गुन्हेगारी वाढली असून पोलिसांपुढे ते रोखणे आव्हान ठरले आहे. घटनास्थळाला अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांनी भेट देत तपास कार्याचा आढावा घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT