Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Chandrapur Crime: प्रेमप्रकरणातून घडलं भयंकर! बेपत्ता तरुणाचा आढळला मृतदेह; चंद्रपूरात खळबळ

सध्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून घुटकाळा भागात या घटनेने तणाव निर्माण झाला होता.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

Chandrapur Crime News: चंद्रपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर शहरात प्रेम प्रकरणातून एका १७ वर्षीय तरुणाची तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दोन दिवसांनी हा प्रकार समोर आला असून पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रपूर (Chandrapur) शहरालगतच्या पडोली भागात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता. यापूर्वी विशाल पाटील नामक शहरातील नेहरू शाळेजवळ वास्तव्याला असलेला युवक बेपत्ता झाला असल्याची तक्रार शहर पोलिसात दाखल होती. याच मिसिंग तक्रारीवरुन पोलिस पथकाने अनोळखी मृतदेह आढळलेल्या जागी पोहोचून ओळख पटविली. 

ज्यानंतर गुप्त माहितीदारांच्या साहाय्याने पोलिसांनी एकूण घटनाक्रमाचा छडा लावला. यामध्ये दोन आरोपींनी विशाल पाटील याची निर्जनस्थळी नेत फावड्याने हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर मृतदेह फ्लाय एशच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. सध्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून घुटकाळा भागात या घटनेने तणाव निर्माण झाला होता. (Latest Marathi News)

राजगडाच्या पायथ्याशी तरुणीचा मृतदेह...

दरम्यान, काल  पुण्यातील (Pune) वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तरुणीचा मृतदेह आढळ्याने खळबळ उडाली आहे. दर्शना दत्तू पवार असे या मृत तरुणीच नाव असून ती नुकतीच एमपीएससी परिक्षेत पास झाली असून तिची वन परिक्षेत्र अधिकारीपदी निवड झाल्याचेही समोर आले आहे. ही तरुणी ८ दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार कुटूंबीयांनी दिली होती. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वर्धा जिल्ह्यात सूर्य आग ओकतोय, तापमानाचा पारा पोहचलाय 46.4 अंशावर

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! पगार ४ पटीने वाढणार? बेसिक सॅलरी इतकी होणार; वाचा कॅल्क्युलेशन

Nauvari Saree Blouse Designs : घरंदाज अन् शालीन लूक हवाय? नऊवारी साडीवर शिवा 'या' पॅटर्नचं ब्लाउज

Mangalsutra Trending Designs: फक्त १०० रूपयांत खरेदी करा मंगळसूत्र, 'या' 6 डिझाईन्स सोन्यापेक्षाही भारी दिसतील

Summer stomach problems: पोट बिघडण्यामागचं खरं कारण काय? उन्हाळ्यातील धोकादायक सवयींबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT