Chandrapur Crime News  AI Image
महाराष्ट्र

Shocking : भयंकर! मटणाचा वाद टोकाला गेला, थोरल्या भावाने धाकट्या भावाला जागीच संपवलं

Chandrapur Crime News : चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे मटणावरून झालेला वाद जीवघेणा ठरला. कुऱ्हाडीच्या हल्ल्यात रमेश बनकर यांचा मृत्यू झाला असून आरोपी मोठा भाऊ जगन बनकर याला पोलिसांनी अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे मटणावरून दोन सख्ख्या भावांमध्ये वाद

  • दारूच्या नशेत झालेला शाब्दिक वाद काही वेळातच हिंसक

  • मोठ्या भावाने कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात धाकट्या भावाचा मृत्यू

  • आरोपीला बेड्या,पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे मटणावरून झालेल्या किरकोळ वादातून भयंकर घडलं. सख्ख्या भावांमध्ये झालेल्या वादानंतर मोठ्या भावाने लहान भावावर कुऱ्हाडीने जीवघेणे वार केले. या हल्ल्यात रमेश श्रीराम बनकर (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी त्यांचा मोठा भाऊ जगन श्रीराम बनकर (वय ६०) याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगन, रमेश आणि त्यांचा दिव्यांग भाऊ किशोर हे तिघेही एकत्र राहत होते. रक्षाबंधनानिमित्त त्यांची बहीण घरी आली होती. बहिणीच्या स्वागतासाठी घरात मटणाचा बेत करण्यात आला होता. बहीण राखी बांधून परतल्यानंतर सायंकाळच्या सुमारास उरलेल्या मटणावरून जगन आणि रमेश यांच्यात वाद सुरू झाला.

दोघेही दारूच्या नशेत असल्याने सुरुवातीला झालेला शाब्दिक वाद काही वेळातच विकोपाला गेला. संतापाच्या भरात जगनने घरात असलेली कुऱ्हाड हातात घेतली आणि रमेश यांच्या मानेवर तसेच डोक्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात रमेश गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. कुऱ्हाडीचे वार अत्यंत गंभीर असल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच भिसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून रक्ताने माखलेला मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील कार्यवाही सुरू केली. दरम्यान, भिसी पोलीस आणि शंकरपूर चौकीच्या पोलिसांनी कारवाई करत आरोपी जगन बनकर याला अटक केली आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद इतका टोकाला गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भिसी पोलीस करत असून, हत्येमागील नेमका घटनाक्रम आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSC प्रकरणाच्या चौकशी आयोगात माझा सहभाग असल्याबाबत कोणतीही माहिती माझ्याकडे नाही - तुकाराम मुंढे

घर नवऱ्याच्या नावावर, तरीही त्यालाच घराबाहेर काढलं! बायकोने जिंकली केस; कोर्टाचा निर्णय नेमका काय?

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई, आदर्श शिक्षक पुरस्कार विजेता मयूर ठाकरेला अटक

Maharashtra : ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर जाणार! ६ नोव्हेंबरपासून आंदोलनाचा इशारा

Supreme Court : रील करणारे कोण, पत्रकार कोण हेच समजत नाही; सरकारचं सुप्रीम कोर्टात उत्तर

SCROLL FOR NEXT