Ballarpur Tehsildar arrested while taking bribe Saam Tv News
महाराष्ट्र

Chandrapur Crime : शेतकऱ्याकडून २ लाखांची लाच घेताना तहसीलदार रंगेहाथ सापडला, तलाठी धूम ठोकून पळाला

Ballarpur Tehsildar Arrested Taking Bribe : एसीबीच्या कारवाईत तहसीलदार अभय गायकवाड यांना अटक करण्यात आली असून दोघांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एसीबीने तहसीलदाराला ताब्यात घेतलं आहे.

Prashant Patil

चंद्रपूर : राज्यात गेल्या काही दिवसांत लाच लुचपतप्रतिबंधक विभागाने कारवाईचा धडाकाच लावलाय. यामुळे छोटे-मोठे अधिकारी जाळ्यात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी परभणीच्या महिला क्रीडा अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीकडून रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यानंतर, आता चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लापूरचे तहसीलदार लाच घेताना जाळ्यात अडकले आहेत. एसीबीने तहसलीदार गायकवाड यांना अटक केली असून यातील दुसरा आरोपी असलेला तलाठी फरार आहे. सध्या, एसीबीकडून आरोपी तलाठीचा शोध सुरु आहे.

बल्लारपूरचे तहसीलदार आणि त्यांचा सहकारी तलाठी असे दोघांनाही लाच घेताना पकडलं आहे. फिर्यादीने स्वतःच्या शेतातील माती आणि मुरूमचे उत्खनन केले होते. मात्र, हे उत्खनन अनधिकृत असल्याचं सांगत संबंधित महसूल कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. अनधिकृत गौण खनिज उत्खननाचे हे प्रकरण असून दाबण्यासाठी लाच मागण्यात आली होती. संबंधित महसूल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याकडे तब्बल २ लाख २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच म्हणून ठरलेल्या रकमेतील १ लाख २० हजार रुपये शेतकऱ्याने त्यांना दिले होते. उर्वरीत १ लाख रुपये शिल्लक असल्याने लाचखोरांनी पैशांसाठी तगादा लावला होता. त्यामुळे, वैतागलेल्या शेतकऱ्याने याची तक्रार एसीबीकडे केली. त्यानंतर, एसीबीच्या पथकाने सापळा रचून महसूल अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक केली.

दरम्यान, एसीबीच्या कारवाईत तहसीलदार अभय गायकवाड यांना अटक करण्यात आली असून दोघांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एसीबीने तहसीलदाराला ताब्यात घेतलं असून तलाठी सचिन पुकळे फरार आहे. या प्रकरणी, एसीबीकडून पुढील कारवाई सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shakun Shastra: घरात तुमच्या हातून या ५ गोष्टी पडणं मानलं जातं अशुभ; भविष्यातील घटनांचे मिळतात संकेत

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये धावत्या टिप्परला लागली आग

Madhavi Nimkar: चाळीशीतल्या माधवी निमकरचं आरस्पानी सौंदर्य, फोटो पाहून काळीज धडधडलं...

Pudina Chutney Recipe: उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवणारी पुदीना चटणी कशी बनवायची?

Blood Pressure : झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवण कराच, BP अन् आणि शुगर राहील कंट्रोलमध्ये; नव्या संशोधनातून महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT