chandrapur Saam
महाराष्ट्र

Crime: टोल नाक्यावर अपघाताचा थरार, कर्मचाऱ्याला चिरडलं, रस्त्यावर रक्त अन्.. VIDEO व्हायरल

Chandrapur-Ballarpur Highway: चंद्रपूर-बल्लारपूर महामार्गावरील विसापूर गावाजवळील टोल नाक्यावर एक भीषण अपघात झाला. डेकोरेशनचे सामान घेऊन भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर थेट गाडी घातली.

Bhagyashree Kamble

चंद्रपूर, बल्लारपूर महामार्गावरील विसापूर गावाजवळील टोल नाक्यावर एक भीषण अपघाताची घटना घडली. डेकोरेशनचे सामान घेऊन जात असलेल्या भरधाव वाहनाने थेट टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर गाडी घातली. या अपघातात युवकाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तातडीने रूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

चंद्रपूर-बल्लारपूर महामार्गावरील विसापूर गावाजवळील टोल नाक्यावर घडलेल्या अपघातामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. संजय वांढरे (वय २७ वर्षे) असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. टोल नाक्यावर संजय उभा होता. तेथून डेकोरेशनचे सामान घेऊन जाणारे वाहन आले. वाहनाचा वेग इतका प्रचंड होता की चालकाने नियंत्रण गमावले आणि टोल बूथजवळ उभ्या असलेल्या संजयवर थेट गाडी घातली.

नंतर आरोपी वाहन घेऊन पसार झाला. वाहनाला अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तोपर्यंत वाहन घेऊन आरोपी पळाला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या संजयवर खासगी रूग्णलयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले असून, आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT