Chandrapur Accident  Saam TV News
महाराष्ट्र

Chandrapur Accident : बहिणीला घेऊन परतताना आक्रित घडलं, दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

Chandrapur Accident : चंद्रपूर जिल्हातील नागभीड तालुक्यात असणाऱ्या किरमिटी येथील रमेश दडमल आपल्या बहिणीला घेण्यासाठी मुलासह सावली तालुक्यातील हरांबा येथे गेला होता. शुक्रवारी बहिणीला घेऊन परत निघाला.

Prashant Patil

चंद्रपूर : जळगावातील जामरनेरनंतर विदर्भातील चंद्रपूरमध्ये देखील एक भीषण अपघात झालाय. यात दोघांचा जागीच मृत्यू झालाय. गावापासून ७० किमी अंतरावर दोघांचा दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात दोघेही गंभीररित्या जखमी झालेत. उपचारासाठी दोघांना रुग्णालयात हलविण्यात आलं. उपचारादरम्यान दोघांचाही दुदैवी मृत्यू झाला. या घटनेनं गावात शोककळा पसरली आहे. रमेश शामराव दडमल (वय ३६) आणि राकेश रामप्रसाद बदन (वय ३०) अशी मृतकांची नावं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्हातील नागभीड तालुक्यात असणाऱ्या किरमिटी येथील रमेश दडमल आपल्या बहिणीला घेण्यासाठी मुलासह सावली तालुक्यातील हरांबा येथे गेला होता. शुक्रवारी बहिणीला घेऊन परत निघाला. मृतक राकेश बदन हा सुधीर दडमल या मित्रासोबत मूल येथे कार्यक्रमाला जात होता. दोघांच्याही दुचाकीची सिंदेवाही तालुक्यातील सरडपारजवळ समोरासमोर धडक झाली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झालेत. नागरिकांनी दोघांनाही राजुली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी किरमिटी येथे शोकाकुल वातावरणात दोघांच्याही पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, जळगावमधील जामनेरमध्ये देखील एक भीषण अपघात झालाय. रामपूर तांडा लहासर येथून विवाह सोहळा आटोपून क्रूझरने घराकडे परतत असताना जामनेर-पहर मार्गावर सोनाळा फाट्याजवळ एक भीषण अपघात झालाय. समोरून भरधाव येणाऱ्या आयशर कंटेनरने जोरदार धडक दिल्याने अपघात होऊन क्रूझर उलटली. या भीषण दुर्घटनेत नवरदेवाचे काका दशरथ रतन चव्हाण हे जागीच ठार झाले. तर अन्य नऊ वऱ्हाडी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांसह वहऱ्हाडातीलच अन्य वाहनांमधील नातेवाइकांनी जखमींना पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनरसह चालकास ताब्यात घेतलं. या प्रकरणी पहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smartphones: जबरदस्त कॅमेरा अन् दमदार स्टोरेज; 40 हजाराच्या आतमधील शानदार 5G मोबाईल फोन

Crime : सावत्र आईशी अश्लील कृत्य करताना पाहिलं, वडिलांनी मुलाला संपवून नदीत फेकून दिलं

The Bengal Files: विरोधामुळे लाईट बंद केले अन्...; 'बंगाल फाइल्स'च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये गोंधळ, विवेक अग्निहोत्री संतापले, म्हणाले...

Smallest Country: जगातील असा कोणता देश आहे जिथे फक्त २७ लोक राहतात?

Kokan Nagar Govinda 10 Thar: एकावर एक थर रचत कोकण नगर गोविंदा पथकाने रचला इतिहास, १० थरांची दिली कडक सलामी; पाहा फोटो

SCROLL FOR NEXT