चंद्रकांत पाटील Saam Tv
महाराष्ट्र

२-३ दिवसात कळेल; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने चर्चेस उधाण

दिलीप कांबळे

मावळ : देहूतील एका कार्यक्रमात व्यासपीठावरुन सूत्रसंचालकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख करताच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले माजी मंत्री म्हणू नका असे म्हणत दोन-तीन दिवसात कळेल असे म्हटल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. chandrakant-patli-says-dont-say-ex-minister-wait-and-watch-dehu-sml80

चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाने देहूसह पुणे जिल्ह्यात तर्क-वितर्काना उधाण आले आहे. देहूत एका दुकानाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी व्यासपीठावरुन सूत्रसंचालक वारंवार माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख करत होता.

त्यावेळी पाटलांनी माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल. असं सूचक विधान करून चर्चेला उधाण आणलं. दरम्यान या उदघाटनानंतर माध्यमांशी बाेलताना भाजपला संभाजी ब्रिगेडचा प्रस्ताव आलेला नाही असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

SCROLL FOR NEXT