Rain : आज काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता...  Saam Tv
महाराष्ट्र

Rain : आज काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता...

काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आज देशाच्या काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ओडिशा, छत्तीसगढ, पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंड, दक्षिण राजस्थान, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मुंबई क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे देखील पहा-

बंगालच्या खाडीवर चक्रवाती परिसंचरण विकसित होणार असून, ते जसे- जसे गतीमान होणार आहे. तसे- तसे राज्यातील विविध भागातमध्ये पावसाला सुरूवात होण्याची शक्यता वर्तवली आहे. सर्वात अगोदर विदर्भात काही भागात पावसाला सुरूवात होणार आहे. तर राज्याच्या उत्तर भागात प्रामुख्याने पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

यानंतर पालघर, ठाणे आणि मुंबईच्या काही भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात आजपासून, तर मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांत उद्या म्हणजेच २१ आणि २२ सप्टेंबरला काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

उत्तर- मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत आजपासून ३ ते ४ दिवस विजांच्या कडकडाटासह काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तिकडे पुणे जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, जालना, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत बुधवारपासून, तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांत काही भागांत आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Doctor Case : मोगलाई व्यवस्थेनं घेतला डॉक्टरचा बळी? प्रशांत बनकरला बेड्या, गोपाळ बदने कधी होणार गजाआड? VIDEO

Maharashtra Live News Update : नाशिकला पुढील पाच दिवस पावसाचा यलो अलर्ट

SRK Film Festival: 'देवदास' ते 'जवान', शाहरुख खानचे 'हे' चित्रपट पुन्हा होणार थिएटरमध्ये प्रदर्शित

Nitin Gadkari: ‘घर की मुर्गी दाल बराबर, बाहेरच्यांना सावजी चिकन, भाजपमधील इनकमिंगवर गडकरींचा टोला

Prajakta mali Photos: प्राजक्ताचं सौंदर्य पाहून चाहते झाले घायाळ

SCROLL FOR NEXT