मान्सूनने आता संपूर्ण देश व्यापला असून पुढील ३ दिवसांत कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. राज्यात जुलै महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे राज्यातील कोणत्याही जिल्ह्यांत जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता नाही. मुंबई शहर तसेच उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत सरासरी १०६ टक्के पावसाची शक्यता (Rain Updates) आहे.
दुसरीकडे नंदुरबार, नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर या भागात देखील जून महिन्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय पूर्व सोलापूर, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rainfall Alert) अंदाज आहे.
विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत जुलै महिन्यांत १०६ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने (IMD Weather Alert) जारी केलेल्या या अंदाजामुळे सध्यातरी शेतकऱ्यांनी आनंदाचं वातावरण आहे. मात्र, हा अंदाज कितपत खरा ठरणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भारतीय हवामान खात्याने आज मुंबईसह उपनगर, पुणे, रायगड तसेच कोकणातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असं सांगण्यात आलंय. विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावाचा अंदाज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.