बैलगाड्या रस्त्यावर सोडून, शेतकऱ्यांचा सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात चक्काजाम! विनोद जिरे
महाराष्ट्र

बैलगाड्या रस्त्यावर सोडून, शेतकऱ्यांचा सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात चक्काजाम!

बीडमधल्या शेतकऱ्यांनी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर मांजरसुंबा येथे बैलगाडी सोडून चक्काजाम आंदोलन केले.

विनोद जिरे

बीड : बीड (Beed) जिल्ह्यात सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात, शेतकरी (Farmers) आक्रमक झाले आहेत. आज सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील (Highway) मांजरसुंबा येथे, बैलगाडी रस्त्यावर सोडून चक्काजाम करत, रस्ता रोको आंदोलन केले. जवळपास दीड तास चाललेल्या या चक्काजाम मुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

हे देखील पहा :

यामुळं प्रवाशांना काही काळ त्रास सहन करावा लागला. भाजपा किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांनी महावितरण विरोधात संताप व्यक्त केला असून चक्का जाम आंदोलन शेकडो शेतकरी बैलगाडी घेऊन सहभागी झाले होते. तर ही सक्तीची वीज बिल वसुली तात्काळ रद्द करा. अन्यथा महावितरण कार्यालयात जागरण गोंधळ आंदोलन करू. असा इशारा भाजप नेते रमेश पोकळे यांनी दिलाय.

यावेळी राज्य सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. तर अगोदरचं पिके करपून जात असताना देखील, आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. आता महावितरण कंपनी सक्तीची बिल वसुली करून शेतकऱ्याला आत्महत्याच्या दारात लोटत आहे. त्यामुळे सक्तीची वीज बिल वसुली तात्काळ रद्द करा. अन्यथा महावितरण कार्यालयात अधिकाऱ्या बसू देणार नाहीत असा इशारा सामाजिक कार्यकर्ते डॉ गणेश ढवळे यांनी दिलाय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voter List Scam: मतदारयांद्यामधील घोळावरुन विरोधक बरसले, निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा

Maharashtra Live News Update: पुण्यातील सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती जवळ आग लागल्याची घटना

दिवाळी अन् छठपूजेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात 'या' ठिकाणांहून सुटणार १७०२ विशेष गाड्या

Firecracker Safety Guide: फटाके फोडताना काळजी घ्या! डॉ. अनुपम टाकळकर यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना|VIDEO

Viral Fever: दिवाळीनंतर वायरल तापाचा धोका वाढतो? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT