Railway Saam TV
महाराष्ट्र

कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरी: कोकण रेल्वेने ( konkan kanya express) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वेची वाहतूक ही ठप्प झाली आहे. कोकण (konkan) रेल्वे मार्गवर धावणाऱ्या कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये (engine) काहीसा बिघाड झाला आहे. आज सकाळच्या सुमारास हा बिघाड झाला आहे. यामुळे कोकण कन्या एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना (passengers) उशीर होण्याचं त्रासाचा सामना करावा लागणार आहे. मुंबईहून (Mumbai) निघालेल्या कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (सीएसएमटी) शनिवारी रात्री निघाली कोकण कन्या गोव्यापासून (Goa) जवळपास २५० किलोमीटर अंतरावर बंद पडली होती.

हे देखील पाहा-

इंजिनमध्ये नेमका काय बिघाड झाला आहे, हे देखील अजून स्पष्ट झाले नाही. ही सेवा किती वाजेपर्यंत दुरुस्त होणार, याविषयी अद्याप कोणती देखील अधिकृत माहिती देण्यात आली नाही. रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता. यानंतर कोकण रेल्वेवर वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. परिणामी विलवडे रेल्वे स्थानकात कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये थांबली आहे. सकाळच्या वेळेस जवळपास २ तासांपासून कोकण रेल्वेची सेवा कोलमडली आहे.

कोकण कन्या एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून शनिवारी रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी सुटली होती. पहाटे ५:३० वाजताच्या सुमारास रत्नागिरी सोडल्यावर विलवडे रेल्वे स्थानकाच्या दिशेने कोकण कन्याचा प्रवास सुरु होते. मात्र, यावेळी गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर विलवडे रेल्वे स्थानकातच कोकण कन्या २ तासांपासून थांबून आहे. मुंबईहून रात्री निघालेली कोकण कन्या एक्स्प्रेस गोव्यामधील मडगाव रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४५ वाजेच्या सुमारास पोहोचते. मात्र, २ तासांपासून रखडलेली ही गाडी आता कधी पोहोचणार, हे अद्याप अस्पष्ट आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT