Mega block Saam tv
महाराष्ट्र

Railway Mega block : मध्य रेल्वेवर तब्बल ५ तासांचा विशेष मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि किती वाजता? जाणून घ्या

Railway Mega block update : मध्य रेल्वेवर तब्बल ५ तासांचा विशेष मेगाब्लॉक असणार आहे. दिवा ते मुंब्रा दरम्यान विशेष मेगाब्लॉक असणार आहे.

Saam Tv

रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबई आअणि ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. मध्य रेल्वेवर रविवारी दिवा आणि मुंब्रा दरम्यान रेल्वे सेक्शन रुपांतरणासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. या मेगा ब्लॉकमुळे रेल्वे सेवेवर परिणाम होणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात २०, २१ एप्रिल आणि मुंब्रादरम्यान रेल्वे सेक्शन रुपांतरणासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेवर २० एप्रिल आणि २२ एप्रिल रोजी दिवा आणि मुंब्रा दरम्यान रेल्वे सेक्शन रुपांतरणासाठी अप मार्गावर विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे.

दिवा आणि मुंब्रा दरम्यान रविवारी दुपारी १ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकमुळे २०, २१ एप्रिल (रविवारी/सोमवारी) रोजी ब्लॉकमुळे एक्स्प्रेस ट्रेनवर परिणाम होणार आहे.

मेल/एक्सप्रेस गाड्यांचे नियमन कसे असेल?

ट्रेन क्रमांक 15181 मऊ - लोकमान्य टिळक टर्मिस मुंबई एक्स्प्रेस सहाव्या मार्गावर दिवा स्टेशन येथून जाणार आहे. ही एक्स्प्रेस ०३.०५ वाजल्यापासून ते ०३.३० वाजल्यापर्यंत (२५ मिनिट) नियमित केली जाईल.

ट्रेन क्रमांक 11020 बनारस - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस कल्याण येथून जाणार आहे. ही एक्स्प्रेस ०३.०० वाजल्यापासून ते ३.१५ वाजल्यापर्यंत (१५ मिनिट) नियमित केली जाईल.

दिनांक २२/२३.०४.२०२५ (मंगळवार/बुधवार रात्री) रोजी ब्लॉकमुळे होणारे परिणाम खालीलप्रमाणे असणार आहेत.

ट्रेन क्रमांक12102 शालिमार - लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई एक्स्प्रेस सहाव्या मार्गावर दिवा जाणार आहे. ही एक्स्प्रेस ०३.०५ वाजल्यापासून ते ०३.३० वाजल्यापर्यंत (२५ मिनिट) नियमित केली जाईल.

11020 बनारस - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस कल्याणमधून जाणार आहे. ही एक्स्प्रेस सकाळी ०३.०० ते दुपारी ३.१५ (१५ मिनिटे) पर्यंत नियमित केली जाईल.

ब्लॉक कालावधीत दिवा आणि ठाणे दरम्यान सहाव्या मार्गावर काही अप मेल गाड्या चालतील. दरम्यान, मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. रेल्वे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT