Neral To Matheran Train Saam TV
महाराष्ट्र

Matheran Toy Train : माथेरान ट्रेन आता पावसाळ्यातही धावणार; मध्य रेल्वेचा प्लान आहे तरी काय? वाचा

Matheran Toy Train update : माथेरानची राणी आता पावसाळ्यातही धावणार आहे. माथेरानची टॉय ट्रेनसाठी मध्य रेल्वे ५ कोटी रुपये खर्च करणार आहे.

Vishal Gangurde

माथेरान : मध्य रेल्वेकडून नेरळ-माथेरान कॉरिडॉर पुढील महिन्यांपासून सुरु होणार आहे. पावसाळ्याच्या महिन्यात माथेरान राणी अर्थात टॉय ट्रेनचा एक मार्ग बंद केला जातो. पावसाळ्यात डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे टॉय ट्रेन बंद ठेवली जाते. मात्र, यावर मध्य रेल्वेने तोडगा काढला आहे. मध्य रेल्वेकडून आता पाणी वाहणाऱ्या मार्गावर बांध घालण्यात येणार आहे. तसेच रुळावरील माती देखील साफ करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यानंतर टॉय ट्रेनची सेवा १५ ऑक्टोबरनंतर सुरु होणार आहे.

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नेरळ-माथेरान मार्गावर पाणी वाहणाऱ्या मार्गावर बांध घालण्यात येत आहेत. पावसाळ्यात रुळावर जमा झालेले दगडही हटवण्यात येणार आहे. रुळावरील दगडामुळे टॉय ट्रेनचं नुकसान होतं. मध्य रेल्वेचे अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, माथेरानच्या डोंगरातून तळापर्यंत पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी चॅनल बसवण्यात येणार आहे. डोंगरावरील पाण्याचा प्रवाहाला योग्य मार्ग दिल्यास टॉय ट्रेनची सेवा पावसाळ्यातही सुरु राहणार आहे.

अँटी क्रॅश बॅरिअर्स लावणार

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही कमीत कमी १९ पूल शोधले आहेत. हे पूलाचे छोटे पाइप सिमेंट क्रॉक्रिंट बॉक्समध्ये बदलण्यात येणार आहे. काही कोपऱ्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. रेल्वे रुळाबाबत पुलाच्या भिंतीची देखील डागडुजी करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या सूत्रानुसार, अँटी क्रॅश बॅरिअर्सची देखील डागडुजी केली जाणार आहे. त्याचबरोबर रंगरंगोटी केली जाणार आहे. नेरळ-माथेरान मार्गावर रुळावर गंभीर दुर्घटना घडू नये, अँटी क्रॅश बॅरिअर्स देखील लावले जाणार आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कामसाठी ५ कोटींचा खर्च लागणार आहे. मध्य रेल्वेकडून संपूर्ण काम होण्यासाठी १२ महिने लागणार आहे. तर कंत्राटदारांसाठी निविदा जारी केली जाणार आहे. रुळावरील माती बाजूला करण्यासाठी जेसीबी मशीनचा वापर केला जाणार आहे. मागील वर्षांत देखील मध्य रेल्वेने माथेरानच्या ट्रेनसाठी विविध काम केले आहेत. दरम्यान, मध्य रेल्वेने ८ जून ते १५ ऑक्टोबरपर्यंत नेरळ-अमन लॉजपर्यंतची सेवा रद्द केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

SCROLL FOR NEXT