kolhapur kalamba central jail, kolhapur news saam tv
महाराष्ट्र

Kalamba Central Jail : कळंबा कारागृहात 'या' ठिकाणी सापडले माेबाईल; कोल्हापुरातील एसटी स्टँडवर पाेलिसांचं कोंबिंग ऑपरेशन

Kolhapur Kalamba Central Jail News: याबाबत जूना राजवाडा पाेलिस ठाण्यात तक्रार नाेंदविण्यात आली.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur Kalamba Jail News : कोल्हापूर शहरातील कळंबा कारागृहाची सुरक्षा दिवसेंदिवस ढिली पडत चाललेली आहे की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. या कारागृहामध्ये वारंवार मोबाईल सापडण्याच्या घटना समोर येत आहेत. (Maharashtra News)

कोल्हापूरच्या (kolhapur) कळंबा मध्यवर्ती कारागृहाची झाडाझडती घेत असताना 2 मोबाईल हॅन्डसेट आढळलेले आहेत. याप्रकरणी कारागृह शिपाई प्रमोद सरगर यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सर्कल क्रमांक पाच मधील बराक क्रमांक चारच्या पाठीमागील परिसरात आणि बराक क्रमांक तीनच्या शौचालयाच्या खिडकीमध्ये हे मोबाईल हँडसेट मिळाले आहेत. हे दोन्ही मोबाईल दुधाच्या रिकाम्या पिशवीमध्ये गुंडाळून बॅटरी चिकटटेपने चिटकवलेल्या स्थितीत आढळले आहेत. कारागृह (jail) कर्मचाऱ्यांनी ही बाब वरिष्ठांना सांगितल्यानंतर जूना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

मध्यवर्ती बस स्थानक परिसरात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन

कोल्हापूरचे मध्यवर्ती बस स्थानक हे गुन्हेगारीचा अड्डा बनत चाललाय. दररोज या ठिकाणी दुचाकी चोरी, मोबाईल चोरी, पाकीट चोरीसह चेन चोरीच्या अशा घटनांनी चोरट्यांनी पोलिसांना हैराण करून सोडलेय.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलिसांनी ज्यादाची कुमक बोलावून कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकात कोंबिंग ऑपरेशन राबवले. या कोंबिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी संशयास्पद फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाईचा बडगा उगारलाय. तसेच प्रवाशांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कोंबिंग ऑपरेशनमध्ये संशयास्पद प्रवास करणाऱ्या 50 पेक्षा अधिक व्यक्तींना पोलिसांनी तपासून त्याची कसून चौकशीही केलीय.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baby Teeth Cleaning Tips: बाळाचे दात घासायला कधी सुरू करावे?

Crime: मौलवीकडून १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, पीडितेने दिला बाळाला जन्म

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या अध्यक्ष होणार : प्रफुल्ल पटेल

Famous Youtuber: प्रसिद्ध युट्यूबरच्या दोन्ही बायका एकाच वेळी प्रेग्नेंट; नेटकऱ्यांना बसला धक्का म्हणाले, 'हा पण ट्रेंड...'

Long Hair Gajra Hairstyle: लांब केसांसाठी गजरा माळणाच्या 5 युनिक हेअरस्टाईल्स, पारंपारिक लूक दिसेल उठून

SCROLL FOR NEXT