celebration of the 348th coronation day of chhatrapati sambhaji maharaj at raigad  Saam Tv
महाराष्ट्र

Raigad: शिवप्रेमींच्या जयघोषाने किल्ले रायगड दुमदुमला; छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा

शिवप्रभुंची आरती आणि पालखी मिरवणुकीने या राज्याभिषेक सोहळ्याची सांगता करण्यात आली.

साम न्यूज नेटवर्क

- राजेश भोस्तेकर

रायगड : स्वराज्याचे पहिले युवराज आणि दुसरे छत्रपती शिवपुत्र संभाजी महाराज यांच्या राज्याभिषक दिनाचा ३४८ वा वर्धापन दिन आज (साेमवार) मोठ्या उत्साहात किल्ले रायगडावर साजरा करण्यात आला. तिथीनुसार माघ शुद्ध सप्तमीला संभाजी राजांचा राज्याभिषेक झाला होता. महाडमधील (mahad) छत्रपती संभाजी महाराज (chhatrapati sambhaji maharaj) राज्याभिषेक दिनोत्सव समिती गेली चार वर्ष हा महोत्सव साजरा करीत आहे. यावेळी शिवप्रेमींनी शिवकालीन वेषभुषा परीधान करून जल्लोष साजरा केला. ब्रह्मवृदाचे मंत्रोच्चार आणि शिवप्रेमींच्या जयघोषाच्या घोषणांच्या साथीने हा सोहळा पार पडला.

ढोल ताशाच्या तालावर तरुण तरुणींनी मर्दांनी खेळांचे प्रात्याक्षिक सादर केले. मान्यवरांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या प्रतिमेवर सप्तसिंधूंचे जल, फुल आणि चलनातील नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. शिवप्रभुंची आरती आणि पालखी मिरवणुकीने या राज्याभिषेक सोहळ्याची सांगता करण्यात आली. 

raigad fort

रायगडवरील (raigad) कार्यक्रमांमध्ये सरकारी अधिकारी उपस्थित नसतात. पुरातत्व विभागाचे अधिकारी देखील समोर येत नाहीत. रायगडवरील कार्यक्रमांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीसाठी शासन निर्णय काढावा लागणार असल्याचे मत महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

Raigad Fort

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirur News : फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट न केल्याने भयानक कृत्य; टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला

Dussehra Apatya Leaves: दसऱ्याला आपट्याची पाने वाटण्यामागे शास्त्र काय आहे?

Kalsubai Fort History: इतिहास, वास्तुकला आणि ट्रेकिंगसाठी खास! वाचा कळसुबाई किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

America Shutdown: ट्रम्प यांना जोरदार धक्का; अमेरिकेत शटडाऊन, सरकारी काम ठप्प, पगारावरही संकट

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

SCROLL FOR NEXT