Shirdi Sai Baba Saam
महाराष्ट्र

Shirdi Sai Baba: साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचा प्रताप, दान पेटीतून लाखोंची रक्कम लंपास; CCTV व्हिडिओतून सत्य समोर

Shirdi Sai Baba Temple Employee: शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या बाळासाहेब नारायण गोंदकर या कर्मचाऱ्याने दक्षिणा पेटीतून लाखो रुपयांची रोकड चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Bhagyashree Kamble

शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने दान पेटीतून लाखो रूपयांची रोकड चोरल्याचे उघडकीस आले आहे. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आरोपीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

बाळासाहेब नारायण गोंदकर असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या लेखा विभागात ते कार्यरत आहेत. त्याने दक्षिणा मोजणीदरम्यान लाखो रुपयांची रक्कम चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. गोंदकर याने ४, ८ आणि ११ एप्रिल रोजी दक्षिणा मोजणीदरम्यान ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल चतुराईने लपवले आणि नंतर ते चोरून नेल्याचे तपासातून समोर आले आहे.

१६ एप्रिलला दक्षिणा मोजणी पूर्ण झाल्यावर नोट मोजणी मशीनमध्ये ४६,५०० रुपये आणि २५ एप्रिलला ५०,००० रुपयांचा आणखी एक बंडल आढळून आला. या दोन्ही घटना संशयास्पद वाटल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी गोंदकर नोटा मांडीखाली, पँटमध्ये आणि मशीनच्या मागे लपवून नंतर घेऊन जाताना स्पष्ट दिसले.

या घटनेची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना समजताच त्यांनी आदेश काढले. त्यांच्या आदेशानुसार गोंदकर याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

गाडीलकर यांनी स्पष्ट केले आहे की, या प्रकरणात कुणाचीही गय केली जाणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकारामुळे साईभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! भाजपच्या दिग्गज नेत्याचा हरिद्वारमध्ये मृतदेह सापडला, राजकारणात खळबळ

ITR Filling 2026: आयटीआर फाइल करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक; आताच तयार ठेवा, अन्यथा येईल अडचण

मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास जलद होणार; मेट्रो ८ च्या कामाला वेग, गोल्डन मार्गावर किती स्टेशन असणार?

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी

Health warning signs: किडनी आणि लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात दिसतात हे बदल; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT