Beed News  Saam TV
महाराष्ट्र

Beed: कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा टेम्पो पकडला; 9 लाखांचा मुद्देमाल जप्त

4 जणांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

विनोद जिरे

बीड: कत्तलीसाठी हैदराबादकडे जनावरे घेऊन जाणारा टेम्पो, बीड पोलिसांनी पकडला आहे. यावेळी 12 जनावरांची सुटका करत, तब्बल 9 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जामखेड येथून टेम्पो क्र. MH 14. BJ 2800 मधून अवैधरीत्या 11 बैल व 1 गाय कत्तल करण्यासाठी, केजमार्गे हैदराबाद येथे नेण्यात येत होते. यावेळी केज शहरातील भवानी चौकात सापळा लावून, हैदराबादकडे जात असलेला टेम्पो पोलिसांनी पकडला.

या कारवाईत 12 जनावरांची सुटका करत 9 लाख 20 हजरांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात, वाहन चालक तारेक अजीज कुरेशी रा. चौसाळा, साबेर मस्जिद कुरेशी, अब्दुल बारी गफार कुरेशी आणि साजेद कुरेशी सर्व रा. जामखेड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Politics: सांगलीत मोठी राजकीय घडामोड, ठाकरेंच्या युवासेनेचा भाजपला पाठिंबा

Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी; २४ तास घेता येणार दर्शन

Maharashtra News Live Updates: शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना मनसेचा पाठिंबा

Surya Gochar 2024: सूर्याचं नक्षत्र गोचर 'या' राशींच्या जीवनात आणणार वादळ; आर्थिक अपयशही येण्याची शक्यता

Maharashtra Election : त्रास देणाऱ्याला सोडू नका, उभा कार्यक्रम करा - मनोज जरांगे

SCROLL FOR NEXT