nagpur, crime news saam tv
महाराष्ट्र

Crime News : ढसाढसा रडत तरुणीने गाठले पाेलिस ठाणे, म्हणाली त्याने माझ्यावर...

मंगेश मोहिते

Nagpur Crime News : लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीवर अत्याचार केल्याची घटना नागपूरात (nagpur) समाेर आली आहे. संबंधिताने युवतीस पाच लाख रुपयांना फसविल्याचं तिने पाेलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. दाेघांची एका लग्न जुळविणा-या संकेतस्थळावर भेट झाली हाेती. यावेळी युवकानं आपण लोको पायलेट आहे असं भासवून युवती आणि तिच्या कुटुंबाची फसवणूक केल्याचे तिने म्हटलं आहे. (Nagpur Latest Marathi News)

लग्न जुळवण्यासाठी असलेल्या संकेतस्थळावर बरीच तरुण तरुणी हे संकेतस्थळावरती आपले संपूर्ण माहिती अपलोड करतात आणि त्यानंतर अनेक तरुणींची फसवणूक झालेले उदाहरण आपण पाहिलेले आहे. नागपूरमध्येही (nagpur) गणेश पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत असाच एक प्रकार उघड झालेला आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका व्यक्तीने तरुणीशी संबंध प्रस्थापित करून पाच लाख रुपयांची फसवणुक केली आहे.

सत्यसमोर आल्यानंतर तरुणीने गणेश पेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर संबंधित युवकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली. पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत म्हणाले संबंधित संशयित आराेपी हा भोपाळ येथील रहिवासी आहे.पीडित तरुणीने लग्नासाठी तिची संपूर्ण माहिती एका विवाह संकेतस्थळावरती अपलोड केली.

त्यानंतर भोपाळ येथील रहिवासी असलेल्या युवकानं (youth) तरुणीशी संपर्क साधला. त्यानंतर तरुणीच्या घरी जाऊन भेटही घेतली. पीडित तरुणी आणि संशयित आरोपी यांचे अनेकदा हॉटेलमध्ये संबंध प्रस्थापित झाले. (Maharashtra News)

आपण लोको पायलेट असल्याचे त्याने तिला सांगितलं हाेते. नागपूर येथे बदली करण्यासाठी पैसे लागतील असं तरुणीला सांगून त्याने तिच्याकडून अनेकदा पैसे घेतले. ती रक्कम एकूण पाच लाख रुपयांपर्यंत पाेहचली.

संबंधित तरुणी ही एक हॉस्पिटलमध्ये काम करते. बदली करून घेण्याची वेळ संपल्यानंतर पीडित तरुणीने संशियतावर लग्नासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. तिने पैसे मागितले. त्यावेळी युवकानं टाळाटाळ केली. त्यामुळे तिला संशय आलं आणि तिने चौकशी केल्यानंतर त्याचे लग्न झाले असल्याचे तिला समजले. या धक्क्यातून तिने पोलीस ठाणे गाठले आणि त्याच्या विराेधात तक्रार दाखल केली. संबंधित युवकावर अत्याचारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याचे पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी नमूद केले. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Israel - Hezbollah War : हिजबोल्ला-इस्त्राइलमध्ये युद्ध पेटलं, स्पेशल रिपोर्ट

Maharashtra News Live Updates : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

Pune Crime : शाळकरी मुलीवर अत्याचार, इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं; 'गुड टच, बॅड टच'मुळं धक्कादायक घटना उघड

Nitin Gadkari: माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट, नितीन गडकरी यांनी सांगितला 'तो' प्रसंग

Shambhuraj Desai on Dhangar Reservation : धनगर आरक्षणासंदर्भात शंभुराज देसाईंची महत्वाची प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT