Karuna Sharma. Beed, Dhananjay Munde saam tv
महाराष्ट्र

Karuna Sharma : करुणा शर्मासह एकावर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

गेले दाेन दिवस बीडच्या राजकारणात शर्मांची चर्चा सुरु झाली आहे.

विनोद जिरे

Karuna Sharma : शिवशक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्यासह अन्य एकावर फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने पाेलिसांनी अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल केला आहे. बीड (beed) येथील परळी (Parli) शहर पोलीस ठाण्यात साेमवारी शर्मा यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे.

करुणा शर्मा यांनी साेमवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात धनंजय मुंडे यांच्या एका कार्यकर्त्यावर शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचे बरे वाईट झाल्यास आमदार धनंजय मुंडे (dhananjay munde) हे जबाबदार असतील असे म्हटले आहे. (Maharashtra News)

दरम्यान बालाजी दहिफळे यांच्या तक्रारीनंतर परळी पोलीसांनी शर्मा यांच्या विरोधात धमकी देत शिवीगाळ केल्याप्रकरणी तक्रार दिली. त्यानूसार करुणा शर्मांसह, अजय देडे यांच्यावर परळी पोलीस ठाण्यात (कलम 507, 34 नुसार) अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझ्याकडे शर्मा यांनी दिलेल्या धमकीचे, शिवीगाळीचे पुरावे आहेत. ते मी पोलीस (police) अधीक्षकांना देणार आहे असे बालाजी दहिफळे यांनी समाज माध्यमातून पाेस्ट करुन शर्मा यांना खुलं आव्हान दिले. (Karuna Sharma Latest Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijaya Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठीत, आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Raj thackeray: आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको, राज ठाकरे कडाडले

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

SCROLL FOR NEXT