Nashik Breaking: भाजप आमदार राहुल ढिकलेंसह 26 जणांवर गुन्हा दाखल
Nashik Breaking: भाजप आमदार राहुल ढिकलेंसह 26 जणांवर गुन्हा दाखल Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Breaking: भाजप आमदार राहुल ढिकलेंसह 26 जणांवर गुन्हा दाखल

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक: भाजप आमदार राहुल ढिकलेंसह 26 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करणं महागात चांगलच महागात पडलं आहे. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करून आंदोलनासाठी गर्दी जमवल्याप्रकरणी गुन्हा केला आहे. बुधवारी ओबीसी आरक्षणासाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपकडून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. नाशिकमध्ये जमावबंदी लागू असतांनाही हे आंदोलन करण्यात आलं, यावेळी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर यासह अन्य नियम पायदळी तुडवण्यात आले.

त्यामुळे भाजप आमदार राहुल ढिकले यांच्यासह 26 भाजप कार्यकर्त्यांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान काल चंद्रशेखर बावनकुळेंनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत ओबीसी आरक्षणावर मोठा निर्णय घेण्यात आला. ओबीसींना येणाऱ्या पोट निवडणूकांमध्ये आरक्षण मिळावे यासाठी अध्यादेश काढणार आहे. यामध्ये SC आणि ST च्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले जाणार असल्याचं छगन भुजबल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Naresh Mhaske News | नवी मुंबईपाठोपाठ मिरारोडमध्येही म्हस्केंना उमेदवारी दिल्याने भाजपमध्ये नाराजी

Viral Video: युट्यूबरची भेटवस्तू पाहून गरीब मुलीच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

Nanded Water Cut: नांदेडकरांनाे पाणी जपून वापरा! चार दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, जाणून घ्या कारण

Eknath Shinde : हेमंत गोंडसेंच्या उमेदवारीला छगन भुजबळांचा विरोध का?; एकनाथ शिंदे म्हणाले...

Today's Marathi News Live : छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या ६ मे रोजी दोन सभा

SCROLL FOR NEXT