MLA Santosh Bangar Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Bangar Update : आमदार बांगर हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; गुन्हा दाखल

हा गुन्हा अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Santosh Bangar Latest Update : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (mla santosh bangar) हल्ला प्रकरणी अंजनगाव सुर्जी येथील 15 ते 20 शिवसैनिकांवर (shivsainik) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर अमरावतीत रविवारी शिवसैनिकांनी हल्ला केला. संतोष बांगर हे कुटुंबीयांसोबत देवदर्शनासाठी गेले असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. हा हल्ला म्हणजे ठरवून केलेले एक षडयंत्र असल्याचे आमदार बांगर यांनी नमूद केले.

दरम्यान आमदार संतोष बांगर हल्ला प्रकरणी अंजनगाव सुर्जी येथील 15 ते 20 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. हा गुन्हा अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर शिवसैनिकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. सुमोटो कारवाई करत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक वानखडे यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्र हादरला! उपचाराच्या बहाण्याने २० वर्षीय तरुणीचा विनयभंग; ठाकरेंच्या शिवसैनिकांनी डॉक्टरला बदडला, आरोपी गजाआड

Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

गणेशोत्सवाच्या तोंडावर सर्वसामान्यांना झटका! LPG सिलेंडर महागला, तुमच्या शहरात आज काय भाव?

Tuesday Horoscope: पैसा, करिअर आणि कुटुंब... या ५ राशींचं नशीब चमकणार! वाचा मंगळवारचे राशीभविष्य

अंबाजोगाईतील मॅरेथॉनपटूची राज्यभरात चर्चा; लेकीच्या शिक्षणासाठी आईची अनवाणी धाव

SCROLL FOR NEXT