Beed Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Beed Accident News: बीडमध्ये केमिकल पावडर घेऊन जाणारा मालवाहू ट्रक पलटी; अपघातात एक जण जखमी...

Beed Latest News: बीडमध्ये केमिकल पावडर घेऊन जाणारा मालवाहू ट्रक पलटी; अपघातात एक जण जखमी...

साम टिव्ही ब्युरो

Beed Accident News: बीडमध्ये केमिकल पावडर घेऊन जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात भरधाव ट्रक पलटी झाल्याने एक जण जखमी झाला आहे. हा अपघात धुळे - सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील बीडच्या पाडळसिंगी टोलनाका परिसरात झाला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती कळताच महामार्ग रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी धाव घेत विशाल डोंगर, यशवंत शिंदे यांनी प्रथमोपचार केले. तर यावेळी प्रतिक कदम, अंबादास जाधव, महादेव पवार, आकाश फुलझळके, मारुती चित्रे यांनी ट्रक रस्त्याच्या बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

धुळे- सोलापूर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात

दरम्यान, शनिवारी बीडमध्ये एसटी बस आणि मिनी बसमध्ये अपघात झाला. यामध्ये 15 प्रवासी जखमी झाले असून जखमींमधील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बीडमधील धुळे - सोलापूर (Dhule- Solapur Highway) या राष्ट्रीय महामार्गावरील वाणगाव फाट्याजवळ भीषण बस अपघाताची घटना घडली. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस आणि खासगी मिनी बसमध्ये हा भीषण अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत जखमींना मदत केली. अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. या सर्वांवर बीडच्या शासकीय रूग्णालयात उपचारात सुरू असून जखमींपैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात इतका भीषण होता की दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT