supriya sule  saam tv
महाराष्ट्र

Political News : भर चौकात महिलेला मारहाण, सुप्रिया सुळे संतापल्या; महिला सुरक्षित आहे का? म्हणत साधला सरकारवर निशाणा

Supriya Sule Latest News : कार ओव्हरटेक केली म्हणून त्या महिलेला भररस्त्यात बेदम मारहाण केली आहे.

Ruchika Jadhav

Supriya Sule: ' राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरात महिलेला भरचौकात मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही? या राज्यात महिला सुरक्षित आहे का ? या प्रकरणाचा कसून तपास होऊन या व्यक्तीला कठोर शासन झालेच पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (Viral Video)

आज (शनिवारी) नागपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली. कार ओव्हरटेक केली म्हणून त्या महिलेला भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. महिलेला मारहाण करताना एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याअंतर्गत इंदोरा चौकाजवळ दुचाकी चालक महिला आणि कारचालक पुरुषामध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. महिला आपल्या दुचाकीने जात होती. त्यावेळी महिलेने समोर असलेल्या चारचाकीला ओव्हरटेक केलं. त्यानंतर त्या कारचालकाने महिलेला बेदम मारहाण केली. शिवशंकर श्रीवास्तव असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. ही घटना दुपारी एक वाजता इंदोरा चौकातून भीम चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कार चालक इंदोरा चौकातून भीम चौकाकडे जात होता. दरम्यान, मागून दुचाकीवरून येणाऱ्या महिलेने त्याला ओव्हरटेक केले. महिला पुढे गेल्याने आरोपी कार चालकाने तिला शिवीगाळ केली. हे ऐकून महिला गाडीतून खाली उतरली आणि आरोपीशी वाद घालू लागली. दोघांमध्ये सुरू झालेला वाद इतका वाढला की हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. आरोपीने कारमधून खाली उतरून महिलेवर हल्ला केला. याच प्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी संबंधित व्यक्तीला कठोर शासन झालेच पाहिजे, असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli News : वंचितच्या उमेदवारावर हल्ला; आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी जमाव पोलीस स्थानकात

Rishabh Pant: विषय पैशांचा नव्हताच..! रिषभने दिल्लीची साथ का सोडली? पोस्ट शेअर करत म्हणाला...

Shukra Gochar: डिसेंबर महिन्यात शुक्र ग्रह करणार डबल गोचर; 'या' राशींना कमवणार नुसता पैसा, उत्पन्नही वाढणार

Vinod Tawde Money Distribution : १५ कोटी वाटल्याचा तावडेंवर आरोप, विरोधक म्हणतात मान्य करा; भाजप म्हणाले, पैसे वाटायला जातीलच का

Health Tips: हिवाळ्यात भाजलेले हरभरे खा; 'हे' आजार राहतील कोसो दूर

SCROLL FOR NEXT