Car Accident News: अहमदनगरमध्ये मोठा अपघात झाला आहे. नगर-औरंगाबाद महामर्गावर कायगाव (ता.गंगापूर) झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही घटना औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर कायगाव जवळील गोदावरी शाळेच्या समोर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात बजाजनगर येथील चार व्यावसायिकांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरहून औरंगाबादच्या (Aurangabad) दिशेने जाणारी कार (क्रमांक एम.एच.२० सी. एस. ५९८२ ) च्या चालकाला कायगाव जवळ वळणाचा अंदाज नाही. त्यामुळे भरधाव कार दुभाजकावर आदळून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार (एम.एच.२७ बी. झेड. ३८८९) ला धडकली. यात औरंगाबादकडे जाणाऱ्या कारमधील चौघे गंभीर जखमी झाले होते.
अपघाताची (Car Accident) माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अशोक चौरे, उपनिरीक्षक विलास , घुसींगे,डॉ. प्रशांत पंडूरे, रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ, सचिन सुराशे, अनंता कुमावत आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अपघातग्रस्त कारचे दरवाजे तोडून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मृतांमधील तीघांची नावे समजली असून रावसाहेब मोटे(५६) सुधीर पाटील (४५) रा. वाळूज सिडको महानगर रतन बेडवाल (३८) रा. वाळूज व इतर एकाचा मृत्यू झाला.
मृत चौघेही मित्र असून प्लॉटिंगचा व्यवसाय करीत होते अशी माहिती मिळाली आहे, चौघेही एका व्यवहारा संदर्भाने नगरला गेले होते. येताना प्रवरासंगम येथे जेवण करून बजाजनगर येथे घरी जात असताना हा अपघात झाला. तर दुसऱ्या कार मधील शशिकला कोराट(७०) सिद्धार्थ जंगले (१४) हेमंत जंगले (५५) छाया जंगले (३५) शंकुतला जंगले (७०) हे पाच जण जखमी झाले होते. अपघात स्थळावरून त्यांना १०८ रुग्णवाहिकेद्वारे औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या कारमधील जखमी प्रवासी अमरावतीहून देवगड जि. अहमनगर येथे देव दर्शनासाठी मुक्कामी जात होते. या अपघातानंतर नगर-औरंगाबाद महामार्गाच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातून अपघातस्थळी नेण्यात आल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.