Hingoli cancer suspected women 2025 saam tv
महाराष्ट्र

Cancer symptoms: महाराष्ट्रातील एका जिल्ह्यातच १४५०० महिलांमध्ये कॅन्सरसारखी लक्षणं, आरोग्यमंत्र्यांची माहिती

Health Minister cancer information : महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागाने राबवलेल्या एका महत्त्वाकांक्षी आरोग्य तपासणी मोहिमेदरम्यान एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकाच जिल्ह्यात तब्बल १४,५०० महिलांमध्ये कर्करोगासारखी प्राथमिक लक्षणे आढळून आली आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

हिंगोली जिल्ह्यात तब्बल १४,५०० महिलांमध्ये कॅन्सरसारखी लक्षणं आढळून आली आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरुवारी ही माहिती विधिमंडळात लेखी उत्तराद्वारे दिली. राज्य सरकारच्या ‘संजीवनी योजना’अंतर्गत झालेल्या तपासणी दरम्यान ही बाब समोर आली आहे.

८ मार्चपासून सुरू झालेलं विशेष महिला सर्वेक्षण

८ मार्च म्हणजेच महिला दिनापासून राज्यात महिलांसाठी खास सर्वेक्षण सुरू करण्यात आलं होतं. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील एकूण २,९२,९९६ महिलांपर्यंत पोहोचून त्यांचं आरोग्य सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणात महिलांना काही प्रश्न विचारण्यात आले आणि त्यांनी दिलेल्या उत्तरांच्या आधारे त्यांच्या आरोग्यविषयक स्थितीचा अंदाज घेतला गेला.

बऱ्याच महिलांमध्ये कर्करोगाची लक्षणं

या सर्वेक्षणादरम्यान जवळपास १४,५४२ महिलांमध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लक्षणं असल्याचं समोर आलं. त्यातील काही प्रकरणं अधिक चिंताजनक आहेत. एकूण तीन महिलांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर, एका महिलेला स्तनाचा कॅन्सर आणि आठ महिलांमध्ये तोंडाचा कॅन्सर असल्याचं निदान झालं आहे.

ही संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने राबवण्यात आलेल्या कर्करोग जनजागृती मोहिमेमुळे समोर आली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश होता की, महिलांमध्ये कॅन्सरची लक्षणं लवकर ओळखणं आणि वेळेत त्यांच्यावर उपचार करता येणं.

कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव नाही

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं की, सध्या हिंगोली किंवा इतर ग्रामीण भागात वेगळं कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाहीये. परंतु ग्रामीण भागांमध्ये तपासणी आणि स्क्रिनिंगचं जाळं अधिक बळकट केलं जाणार आहे. राज्यभरातील जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅन्सर तपासणीसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयासोबत करार करण्यात आला आहे

टाटा मेमोरियल रुग्णालयातील डॉक्टरांची टीम दर महिन्याला दोन वेळा जिल्हा रुग्णालयांमध्ये जाऊन त्याठिकाणी कॅम्प घेणार आहे. या कॅम्पद्वारे महिलांची तपासणी, मार्गदर्शन आणि प्राथमिक उपचार केले जाणार आहेत.

आठ जिल्हा रुग्णालयांमध्ये डे-केअर केमोथेरपी केंद्र सुरू

राज्यातील आठ जिल्हा रुग्णालयांमध्ये ‘डे-केअर केमोथेरपी सेंटर्स’ सुरू करण्यात आले आहेत. यामुळे रुग्णांना मोठ्या शहरांत जावं लागणार नाही आणि त्यांना जवळच उपचार घेता येतील. भविष्यात अशा सुविधा राज्यातील इतर जिल्ह्यांतही सुरू करण्याची तयारी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IGI Aviation Recruitment: एव्हिशन सर्व्हिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Maharashtra Live News Update : सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी विधान परिषदेमध्ये चर्चा

Face Care: चेहऱ्यावर मध लावल्याने होऊ शकतात या गंभीर समस्या, वेळीच व्हा सावधान

Mumbai: १५० वर्षाचा कर्नाक पूल 'सिंदूर' ब्रिज का झाला? वाचा मुंबईकरांना फायदा काय होणार

Mumbai Accident: मुंबईत बस आणि ट्रकचा भीषण अपघात, ५ ते ६ प्रवासी गंभीर जखमी; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT