Sambhajiraje Chhatrapati News, Sambhajiraje news in Marathi, Rajysabha election 2022 News Updates Saam Tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! संभाजीराजे राज्यसभेच्या रिंगणातून माघार घेणार?

संभाजीराजे निवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसंदर्भात (Rajyasabha Elections) एक मोठी बातमी समोर आली आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) निवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती आहे. सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे. शिवसेनेनं (Shivsena) सहावा उमेदवार दिल्याने संभाजीराजेंची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते लवकरच माघार घेणार असल्याची माहिती आहे. (Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi News)

राज्यसभेसाठी शिवसेनेतर्फे आज (२६ मे) संजय राऊत (Sanjay Raut) आणि संजय पवार (Sanjay Pawar) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी ते विधानभवनात दाखल सुद्धा झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सुद्धा विधान भवनात दाखल झाले आहेत. (Rajysabha election 2022 News Updates)

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने त्यांच्या उमेदवारीचा विषय मागे पडला. संजय राऊत यांच्याबरोबर कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावावर दुसऱ्या जागेसाठी शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती निवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती आहे. सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे.

दरम्यान, जेव्हा राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि संभाजीराजेंमध्ये बोलणी सुरू होती. तेव्हा शिवसेनेनं संभाजीराजेंसमोर लेखी प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव साम टीव्हीच्या हाती लागला आहे. शिवसेनेनं संभाजीराजेंसमोर अनेक अटी घातल्या होत्या. त्यातील सर्वात मोठी अट म्हणजे संभाजीराजेंनी शिवसेनेचे खासदार म्हणूनच राहावं, दुसरं म्हणजे संभाजीराजेंनी शिवसेनेची भूमिका मांडावी आणि तिसरी अट म्हणजे सर्व निवडणुकींमध्ये त्यांनी शिवसेनेचा प्रचार करावा.

शिवसेनेने घालून दिलेल्या अटी संभाजीराजेंना मान्य नव्हत्या. त्यामुळे शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यामधील बोलणी फिसकटली आणि शिवसेनेनं संजय पवार यांना उमेदवारी दिली. आता निवडणुकीत आकड्याची जुळवाजुळव होत नसल्यानं तसंच शिवसेनेनं सहावा उमेदवार दिल्याने संभाजीराजेंची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते लवकरच माघार घेणार असल्याची माहिती आहे. संभाजीराजे लवकरच पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती देणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, स्लीप वाटण्यावरून वाद

Pune Crime: थंड वडापाव दिला म्हणून ग्राहक तापला, स्नॅक्स सेंटरचालकाला काचेची बरणी फेकून मारली

SCROLL FOR NEXT