नांदेड : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. आमदार, खासदारांपाठोपाठ नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी देखील शिंदे गटाची वाट धरली. दरम्यान, एकीकडे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील होत असताना, दुसरीकडे नांदेडमधून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Ashok Chavan Latest News)
अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सध्या नांदेड जिल्ह्यात सुरू आहे. विशेष बाब म्हणजे तब्बल 20 दिवसांपासून ही चर्चा सुरू आहे. चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगताच कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. त्यातच मागील दोन ते तीन दिवसांत या चर्चेने जोर धरल्याने खरचं आता चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. (Ashok Chavan News)
दरम्यान, एकीकडे चव्हाण हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असताना, दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी या विषयावर बोलण्यावर टाळलं आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांचं मौन हे त्यांना भाजपच्या वाटेवर घेऊन जाणार का? असे तर्क वितर्क लावले जात आहे.
भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील काही दिवसांपुर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तर स्वागतच आहे अशा पध्दतीचं वक्तव्य केलं होतं. कॉंग्रसचे ज्येष्ठ नेते म्हणून मराठवाड्यात अशोक चव्हाण यांची ओळख आहे. त्यामुळे जर त्यांनी भाजपची वाट धरली तर मराठवाड्यात कॉंग्रेसला मोठं खिंडार पडणार आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.