नंदुरबारमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुमाकूळ; नेत्यांच्या घरच्या उमेदवारांमुळे निवडणुक बनली प्रतिष्ठेची दिनू गावित
महाराष्ट्र

नंदुरबारमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुमाकूळ; नेत्यांच्या घरच्या उमेदवारांमुळे निवडणूक बनली प्रतिष्ठेची

अक्कलकुवा तालुक्यातील खापर गटात भाजप आणि काँग्रेस उमेदवारांमध्ये सरळ लढत आहे.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार:- नंदुरबार जिल्ह्यातील 11 जिल्हा परिषद Zilla Parishadगट व पंचायत समितीच्या 14 गणांसाठी जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीच्या By-election प्रचाराचा धुमाकूळ सुरू असून अक्कलकुवा तालुक्यातील खापर गटात भाजप BJP आणि काँग्रेस Congress उमेदवारांमध्ये सरळ लढत आहे. काँग्रेसने गीता पाडवी यांना उमेदवारी दिली असून भाजपने नागेश पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. (By-election campaign in Nandurbar)

राजकीय पार्श्वभूमी व प्रचाराचा धुमाकूळ पाहता खापर गटात भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे उमेदवार नागेश पाडवी यांच्या प्रचारासाठी भाजप आमदार राजेश पाडवी BJP MLA Rajesh Padvi व भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात आली. नंदुरबार तालुक्यातील कोळदे गटातून भाजपचे आमदार विजय कुमार गावित यांची कन्या सुप्रिया गावित यांनी राजकारणात पदार्पण केले असून आपल्या मुलीच्या विजयासाठी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित व बहीण खासदार डॉक्टर हिना गावित Hina Gavit यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.

तर कोपरली गटात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र राम रघुवंशी शिवसेने Shivsena कडून निवडणूक लढवत असून त्यांच्यासमोर भाजपचे उमेदवार पंकज गावित यांच्यात जोरदार टक्कर होणार आहे. जिल्ह्यातील काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी NCP आपापल्या उमेदवारांच्या विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पारा घसरला, मुंबई-पुण्यासह राज्यात थंडीची लाट

Maharashtra Tourism : हिवाळ्यात ट्रेकिंगसाठी महाराष्ट्रातील 'हे' जुळे किल्ले बेस्ट, आताच ट्रिप प्लान करा

HBD Juhi Chawla : चित्रपटांपासून दूर असलेली जूही चावला आहे गडगंज श्रीमंत, संपत्ती आकडा वाचून धक्का बसेल

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! २ तासांचा प्रवास फक्त १० मिनिटात, ३९०० कोटींचा प्रोजेक्ट, वाचा सरकारचा मास्टर प्लॅन!

Shocking : पुणे हादरलं! लग्नाचे आमिष दाखवून २ तरुणींवर बलात्कार

SCROLL FOR NEXT