अशोक कौशिक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक. 
महाराष्ट्र

खळबळजनक ः गोंदियात व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या

अभिजीत घोरमारे

गोंदिया ः गोंदिया शहरात आज सकाळी खळबळजनक घटना घडली. एका व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येने शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. नेमकी कोणत्या कारणातून हत्या करण्यात आली याचा तपास पोलिस घेत आहेत. शहरातील गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. हे पोलिसांसाठी मोठे आव्हान आहे.

अशोक कौशिक असे या हत्या झालेल्या व्यापाऱ्याने नाव आहे. शहरातील सर्कस ग्राउंड परिसरात ते राहतात. कौशिक यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान ते मॉर्निग वॉकला गेले होते. त्यावेळी एकजण पाठीमागून आला. त्याने कौशिक यांच्या मानेवर बंदूक ताणली. काही कळायच्या आतच कौशिक यांच्या मानेवर गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर आरोपीने घटनास्थळीच बंदूक फेकून देत पळ काढला. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.Businessman killed in Gondia shooting abn79

अशोक कौशिक यांचा सर्कस ग्राउंड परिसरात एनसीसी नावाने ट्रान्सपोर्ट आहे. ते नेहमीप्रमाणे आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान घराबाहेर निघत सर्कस ग्राउंडकडे जात होते. त्यावेळी एका अज्ञात इसमाने पाठीमागून येत त्यांच्या मानेवर बंदुकीतून गोळी झाडत पळ काढला.

यावेळी त्याने स्वतःजवळील बंदूकदेखील घटनास्थळी फेकून दिली. दरम्यान रस्त्यावर जाणाऱ्या लोकांनी कौशिक यांचा मृतदेह पाहताच गोंदिया शहर पोलिसांना याची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. गोंदिया शहर पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.Businessman killed in Gondia shooting

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pastry: ओव्हनची काय गरज कुकरमध्येच बनवा टेस्टी न्यू इयर स्पेशल पेस्ट्री केक, वाचा सोपी रेसिपी

Bajrang Dal Vandalism Mall: बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा राडा; धर्म विचारून रायपुरच्या मॅग्नेटो मॉलमध्ये तोडफोड

Old Is Gold उमेदवारीचा भाजपचा फाॅर्म्युला ठरला, त्या नगरसेवकांना पुन्हा संधी|VIDEO

Karjat Tourism : ट्रेकिंग अन् हायकिंगसाठी कर्जतजवळील भन्नाट लोकेशन, न्यू इयर वीकेंड 'येथे' प्लान करा

Shocking: कुत्र्याची हत्या, सशाचे मटण सांगून गावभर विकले; खाताच गावकऱ्यांची प्रकृती खालावली, तरुणाने असं का केलं?

SCROLL FOR NEXT