Nandurbar Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking Crime News : भरदिवसा व्यावसायिकाचं अपहरण, सराफाला नग्न करून मारहाण, ५० किलो चांदी, सोनं आणि मोठी रक्कम लुटली

Nandurbar Crime News : नंदुरबार जिल्ह्यात भरदिवसा सराफ व्यापाराचे अज्ञातांनी अपहरण करून लूट केली. इतक्यावरच न थांबता नराधमाने नग्न करून मारहाण केली. ५० किलो चांदी, सोनं आणि मोठी रक्कम लुटल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

शहादा तालुक्यात भरदिवसा सराफ व्यापाऱ्याच अपहरण

हल्लेखोरांनी ५० किलो चांदी, सोनं आणि मोठी रक्कम लुटली

पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह

व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण.

सागर निकवाडे, साम प्रतिनिधी नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहादा तालुक्यातील बुडीगव्हाण गावाजवळ भरदिवसा सराफ व्यावसायिक रितेश पारेख यांचे अज्ञात हल्लेखोरांनी अपहरण केले. या वेळी लुटारूंनी त्यांच्या वाहनाची तोडफोड करत अंदाजे 50 किलो चांदी, सोने आणि मोठी नगद रक्कम लुटल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातून म्हसावद गावाकडे व्यापारासाठी जात असताना रितेश पारेख यांना चोरट्यांनी लक्ष्य केले. हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या आणि त्यांना धमकावले. सर्वात संतापजनक बाब म्हणजे, अपहरण करण्यापूर्वी व्यावसायिकाचे कपडे काढून नग्न अवस्थेत मारहाण करण्यात आली आणि याच नग्न अवस्थेत त्यांचे अपहरण करण्यात आले. म्हसावद पोलीस ठाण्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर ही घटना घडल्यामुळे पोलिसांच्या गस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या घटनेमुळे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच रितेश पारेख यांचे नातेवाईक आणि शहरातील सोनार व्यावसायिक यांनी शहादा पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे. अपहरणकर्त्यांना लवकरात लवकर शोधून त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

शहादा पोलीस ठाण्यात सध्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भरदिवसा झालेली ही लूटमार आणि अपहरणाची घटना नंदुरबार जिल्ह्याच्या शांततेला गालबोट लावणारी असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान जिल्ह्यातून गुन्हेगारांना पकडण्यासाठी मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asthma: अस्थमाची लक्षणे कोणती? अशी घ्या काळजी

Bihar Election : निवडणुकीआधी माजी उपमुख्यमंत्र्यांचा दणका; 27 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार? चाहत्यांमध्ये खळबळ

Maharashtra Politics: कोकणात वर्चस्वासाठी राणे बंधूंमध्ये संघर्ष, थोपटले एकमेकांविरोधात दंड

Pramod Mahajan Case: प्रमोद महाजनांना का संपवलं? महाजनांच्या हत्येचा नवा अँगल समोर

SCROLL FOR NEXT