Hemant Parakh News Saam TV
महाराष्ट्र

Hemant Parakh News: खळबळजनक! सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक हेमंत पारख यांचे अपहरण; घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Crime News: धक्कादायक घटना समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करतायत.

Ruchika Jadhav

Nashik News:

नाशिकमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तसेच गजरा ग्रुपचे चेअरमन हेमंत पारख यांचे त्यांच्याच राहत्या घरातून अपहरण करण्यात आले आहे. धक्कादायक घटना समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करतायत. (Latest Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हेमंत पारख हे नाशिकच्या इंदिरानगर परिसरात राहतात. शनिवारी रात्री आपल्या घरी असताना अचानक त्यांच्या घरासमोर दुचाकी आणि चारचाकी आल्या. त्यातील व्यक्तींनीच त्यांचे अपहरण केल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. सदर घटना रात्री ९.४० च्या सुमारास घडली आहे.

एवढ्या मोठ्या व्यवसायिकाचे त्याच्याच राहत्या घरातून अपहरण झाल्याने परिसरात एकच खळबळ उडालीये. घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस सीसीटीमधील दृश्यांची मदत घेत आहेत. हेमंत हे नाशिकमधील फार मोठे आणि प्रसिद्ध व्यवसायिक आहेत. ते गजरा ग्रुपचे चेअरमन देखील आहेत.

त्यांचे अपहरण फक्त पैशांच्या हेतून करण्यात आले आहे का? की यामागे वेगळं काही कारण आहे. अशा सर्वच प्रश्नांची उकल पोलीस आपल्या तपासातून करतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

SCROLL FOR NEXT