घरात किराणा नाही, पगारही नाही; बस चालकाची गळफास घेऊन आत्महत्या Saam Tv
महाराष्ट्र

घरात किराणा नाही, पगारही नाही; बस चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

या सरकारसह शासनाला कधी जाग येणार? आणखीन किती कर्मचाऱ्यांचे बळी गेल्यावर सरकार बस कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करणार? असा सवाल देखील इतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

विनोद जिरे

बीड - डोळ्यात तेल ओतून प्रवाशांना आपल्या लालपरीत, सुखरूप पोहोचवण्याचं काम करणाऱ्या बस चालकाने, आर्थिक विवंचनेतून आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे. तुकाराम सानप असे या बस चालकाचे नाव आहे. तर घरात किराणा नव्हता...त्यात महावितरणने गेल्या 15 दिवसांपूर्वी घराचे वीज कनेक्शन कट केलं...सणवार तोंडावर त्यात पगार कमी आणि वेळेवर पगार न मिळाल्याने तुकाराम सानप यांनी आत्महत्या केल्याचे सहकारी कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.

हे देखील पहा -

तुकाराम सानप यांनी काल दिवसभर नियोजनानुसार रंजेगाव येथील बसच्या फेऱ्या केल्या होत्या. घरी गेल्यानंतर त्यांनी अंकुश नगर येथील राहत्या घरी गळफास घेऊ आत्महत्या केली. नियमानुसार बस कर्मचाऱ्यांचा पगार 7 तारखे पर्यंत होत असतो. परंतु या महिन्यात अजून सुद्धा पगार झालेला नाही. यामुळे सध्या बस स्थानकातील कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करण्याची वेळ आली.

मयत तुकाराम सानप यांच्या घरची लाईट गेल्या 15 दिवसापुर्वी कट केली होती. यासह घरातील किराणा संपला होता, यासह इतर कारणांमुळे तुकाराम सानप यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईक, मित्र, बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी दिली. मयत सानप यांना दोन मुले आहेत. काम करुन सुद्धा कर्मचाऱ्यांना वेळेवर पैसे मिळत नाहीत त्यामुळं कर्मचारी टोकाचं पाऊल उचलत आहेत. त्यामुळं या सरकारसह शासनाला कधी जाग येणार? आणखीन किती कर्मचाऱ्यांचे बळी गेल्यावर सरकार बस कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करणार? असा सवाल देखील इतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

SCROLL FOR NEXT