Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : माणगाव - रायगड रस्त्यावर भीषण अपघात; 10 प्रवासी जखमी

जखमींवर पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Raigad Bus Accident News: माणगाव ते रायगड (Raigad) रस्त्यावर सहलीवरुन परतत असताना बसचा भीषण अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही बस सुमारे 10 ते 15 फूट खाली कोसळली आहे. या भीषण अपघातात (Accident) 10 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना रुग्णलयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. जखमींवर पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हे सर्व प्रवासी किल्ले रायगडावर फिरायला गेले होते. फिरून परतत असताना बसला हा अपघात झाला आहे. हे प्रवासी पुण्यातील निगडीचे असल्याची माहिती मिळाली आहे. हा भीषण अपघात काल म्हणजेच 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास झाला. किल्ले रायगड ते निजामपूर मार्गावरील घरोशीवाडीनजीक या बसचा अपघात झाला. अवघड वळणावर बसवरील ताबा सुटला आणि ही बस रस्त्याखाली सुमारे 10 ते 15 फूट कोसळली.

या बसमध्ये पालकांबरोबर त्यांची लहान मुलेही होती. हे सगळे रायगडच्या सहलीसाठी आले होते. रायगडची सहल करुन हे प्रवासी परत जात होते. परतीच्या प्रवास सुरु असताना बसच्या चालकाचा ताबा सुटल्यानं बस रस्त्यावरुन 15 ते 20 फूट खाली दरीमध्ये कोसळल्याची माहिती स्थानिक रहिवाश्यांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Saraf Age: अशोक सराफ यांचे खरं वय किती?

Nitanshi Goel: 'लापता लेडीज'मधील 'फूल'चा ऑफ-शोल्डर गाऊन लूक पाहिलात का?

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

Mumbai Monorail : मुंबईत मोनो रेल अडीच तासांपासून विस्कळीत; तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे हाल|VIDEO

Pandharpur Crime : पंढरपूर हादरले; पत्नीला कलाकेंद्रात नाचायला पाठवलं, दिराने केली भावजयीची हत्या

SCROLL FOR NEXT