bull died in bull fight held in kokan recently. saam tv
महाराष्ट्र

झुंज? आम्ही नाही पाहिली! बैलाच्या मृत्यूनंतर सेना पदाधिका-याच्या दबावाखाली पाेलिस

या प्रकाराबाबत काेणीच काही बाेलायला तयार नाही.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : मालवण (malvan) तळगाव येथील एका मैदानात कुडाळ (kudal) येथील दोन बैलांची झुंज (bull fight) आयोजित करण्यात आली होती. ही झुंज तब्बल एकतास सुरू होती. वेंगुर्ला तालुक्यातील आसोली गावातील विकी केरकर यांच्या मालकीचा बैल झुंजी दरम्यान जखमी झाला होता. त्या बैलाचा अखेर मृत्यू झाला आहे. (sindhudurg latest marathi news)

बैलांच्या झुंजीस सर्वाेच्च न्यायालयाने बंदी घातली असताना हजारो लोकांच्या उपस्थितीत येथील खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांच्या गावात घेण्यात आलेल्या या बैल झुंजीला परवानगी कोणी दिली असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या झुंजीत विजयी (victory) झालेला बैल हा कुडाळ नेरूर गावातील शिवसेनेच्या (shivsena) एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याचा होता म्हणून पोलीस (police) गप्प होते का असा प्रश्न सर्व सामान्य नागरीकांना पडला आहे. सध्या सोशल मीडियावर (social media) या झुंजीचे व्हिडिओ व्हायरल (viral) होत असून या मुक्या जनावराचे विव्हळणे मन हेलावून टाकणारे आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT