Buldhana Clash  Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Clash : बुलडाण्यात होळी दहनाच्या वेळीच तुफान राडा; दोन गटांची लाठाकाठ्यांनी हाणामारी, ५ जणांची प्रकृती गंभीर

Buldhana clash during holi festival : बुलडाण्यातील विठ्ठलवाडीमध्ये होळी दहनाच्या वेळी दोन गटात लाठ्याकाठ्यांनी हाणामारी झाली आहे. या गावातील दोन गटाच्या हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे.

संजय जाधव

Buldhana clash News :

राज्यात सर्वत्र होळी सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. होळी सणानिमित्त शहर, गावातील सर्व मंडळी एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरातील लोकांनी होळी दहनाची तयारी केली आहे. मात्र, बुलडाण्यात होळी दहनाच्या वेळीच तुफान राडा झाला आहे. बुलडाण्यातील विठ्ठलवाडीमध्ये होळी दहनाच्या वेळी दोन गटात लाठ्याकाठ्यांनी हाणामारी झाली. या गावातील दोन गटाच्या हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. (latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाण्यातील मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे होळी दहनाचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी लहान मुलांचं भांडण झालं. या लहान मुलांच्या भांडणावरून गावातील दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. या हाणामारीत सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

होळी दहनाच्या वेळी झालेल्या हाणामारीमध्ये जखमी झालेल्या व्यक्तीमध्ये ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी बुलडाण्यासाठी सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. सध्या गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

नेमकं काय घडलं?

बुलडाण्याच्या विठ्ठलवाडी या गावात लहान मुलांनी होळी पेटवली, तेव्हा लहान मुलांचा गोंधळ सुरु होता. त्यावेळी मुलामध्ये धक्काबुक्की झाली. या लहान मुलांनी त्यांच्या घरी जाऊन घटनेची माहिती दिली. या लहान मुलांच्या भांडणावरून मोठी मंडळी भांडायला लागली. या भांडणाचे रुपांत लाठ्याकाठ्याच्या मारहाणीत झालं. यात पुरुष-महिलांनी एकमेकांना जबर मारहाण केली.

जखमींवर उपचार सुरु

या हाणामारीतील १७ जण जखमी झाले आहेत. या जखमींना मेहेकर येथील ग्रामीण रुग्णाल्यात दाखल करण्यात आलं. तर 5 जण गंभीर जखमी असून त्यांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे रवाना केलं आहे. विठ्ठलवाडी गावात पोलिसांचं दंगाकाबू पथक पोहोचले आहे. सध्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे. गावात तणावपूर्ण शांताता असून डोनगाव पोलिसांत तक्रार देण्यासाठी दोन्हीकडील मंडळी पोहोचली आहे. या प्रकरणात अद्याप गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: गंभीर विषयावर बैठक, माजी महापौर गेम खेळण्यात दंग; VIDEO व्हायरल; नागरिक संतापले

बायकोच्या नावाने १ लाखांची FD करा; पोस्ट ऑफिसच्या 'या' स्किममधून मिळतील उत्तम रिटर्न्स

Dohale Jevan History: गरोदर महिलेचे डोहाळे जेवण का करतात? कधीपासून सुरू झाली ही प्रथा

Maharashtra Live News Update: खासदार संजय राऊत आज अहिल्यानगर दौऱ्यावर

भंडारदऱ्याला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, १५ ते १७ ऑगस्टदरम्यान वाहतूक मार्गात मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?|VIDEO

SCROLL FOR NEXT