Buldhana Takkal Virus  Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Takkal Virus: बुलडाण्यात टक्कल व्हायरसची भीती कायम, १२ ते १५ गावातील नागरिकांना टक्कल, आतापर्यंत काय घडलं?

Buldhana News: बुलडाण्यामध्ये टक्कल व्हायरसची भीती आणखी वाढली आहे. हळूहळू टक्कल पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. नागरिकांना टक्कल का पडत आहे यामागचे कारण शोधण्यात अद्याप आरोग्य विभागाला यश आले नाही.

Priya More

संजय जाधव, बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये टक्कल व्हायरसमुळे भीतीचे वातावरण आहे. जवळपास १२ ते १५ गावात केस गळती आणि टक्कल पडण्याचा प्रकार समोर आला आहे. आता १५ दिवस उलटले आहे मात्र तरीही आरोग्य प्रशासनाला याच्या कारणाचा अद्यापही ठाव ठिकाणाला लागला नाही. तर निदान करण्यातही आरोग्य प्रशासन अद्याप अपयशी ठरले आहे.

त्यामुळे आज केंद्र सरकारच्या सर्वोच्च आरोग्य संस्थेचं अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) पथक या परिसरात दौरा करणार आहे. साधारणतः दुपारी १२ वाजता हे पथक या परिसरात दाखल होणार आहे. हे पथक केस गळतीच्या कारणांचा शोध घेणार आहे. सुरुवातीला हे फंगल इन्फेक्शन किंवा पाण्यामुळे केस गळती होत असल्याचे सांगण्यात येत होतं मात्र अद्यापही आरोग्य प्रशासनाला याचे निदान करणे शक्य झालेलं नाही.

केस गळती प्रकरणात आतापर्यंत काय-काय झालं -

- २६ डिसेंबर रोजी या परिसरातील अनेकांच्या डोक्याला खाज येऊन सुरुवातीला केस गळती व नंतर तीन ते चार दिवसांत टक्कल पडण्यास सुरुवात झाली.

- सर्वप्रथम साम टीव्ही ने ही बातमी उजेडात आणल्यानंतर प्रशासन खळबळून जागं झालं.

- आरोग्य प्रशासनाने तात्काळ या भागात सर्वेक्षण सुरू केलं या भागातील पाण्याचे नमुने चाचणीसाठी पाठवले.

- आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांचे पथक या भागात दाखल झालं त्यांनी या भागातील रुग्णांचे रक्ताचे व त्वचेचे नमुने तपासणीसाठी पाठवले.

- पाण्याच्या नमुन्यात नायट्रेट्स व टीडीएस चे प्रमाण वाढलेला आढळलं.

- सुरुवातीला आरोग्य प्रशासनाने हे फंगल इन्फेक्शन असल्याची शक्यता वर्तवली तर काहींनी पाण्यामुळे केस गळती होत असल्याचे सांगितलं.

- या परिसरातील पाण्याचे नमुने नाशिक व अहमदाबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे ज्याचा अहवाल एक आठवड्यानंतर येणार आहे.

- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या भागाचा दौरा केला.

- दरम्यान अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने त्वचेचे व रक्ताचे नमुने तपासले असता यात कुठलंही फंगल इन्फेक्शन अथवा रक्तात कुठलेही दोष आढळून आल्या नसल्याचा अहवाल दिला आहे.

- दरम्यान केस गळतीचे रुपन दररोज वाढतच असल्याने केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्राची सर्वोच्च संस्था असलेल्या आयसीएमआरला या भागाचा दौरा निर्देश करण्याचे आदेश दिलेत.

- आज आयसीएमआर चेन्नई व दिल्लीचे पथक या परिसरात भेट देऊन केस गळतीच्या कारणांचा शोध घेणार आहे.

- दरम्यान अद्यापही आरोग्य विभागाला केस गळती का होत आहे याचं निदान करणे शक्य झालं नाही त्यामुळे आरोग्य विभागाचे हात अद्यापही रिकामीच आहेत.

गेल्या दोन आठवड्यापासून शेगाव तालुक्यातील जवळपास १५ गावामध्ये केस गळती आणि टक्कल पडण्याचा प्रकार सुरूच आहे. आरोग्य प्रशासनाने या परिसरात सर्वेक्षण सुरू करून तात्पुरता उपचारही केला आहे. मात्र अद्यापही केस गळती सुरूच असून काल मिशी आणि हातावरील केस गळण्याचे काही रुग्ण समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे नेमका हा कुठला आजार आहे यावर ठोस अद्यापही आरोग्य प्रशासनाला सांगता येत नाही. आज आयसीएमआरचा पथक या भागाचा दौरा करून नेमका काय अहवाल सादर करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : मन थोडं अस्वस्थ होईल; ५ राशींच्या लोकांवर रविवारी मोठं संकट

भाजपची ताकद वाढणार; समरजीत सिंह घाटगे यांची पुन्हा घरवापसी

इराणच्या निशाण्यावर थेट युएई; ट्रम्पच्या नादात आखात जळणार? VIDEO

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या हवाला रॅकेटचं दुबई कनेक्शन? मोबाईलमधून बाहेर येणार खरातची 'कुंडली', वाचा खास रिपोर्ट

'VSR च्या रोहित सिंगला अटक करा'; जय पवारांची पहिल्यांदाच मागणी, नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT