buldhana accident Saam tv
महाराष्ट्र

बुलढाण्यात भीषण अपघात; ST बस अन् दुचाकीची समोरासमोर धडक, ३ तरुणांचा जागीच मृत्यू

buldhana accident : बुलढाण्यात भीषण अपघात झालाय. ST बस अन् दुचाकी समोरासमोर धडक झालीये. यात तिघांचा मृत्यू झालाय.

Vishal Gangurde

राज्यात अपघातांची मालिका

बुलढाण्यात भीषण अपघात

भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

राज्यात अपघातांची मालिका थांबेना झाली आहे. बुलढाण्यातही भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बुलढाण्यात एसटी बस आणि दुचाकीचा मोठा अपघात घडला. महामार्गावर सोमवारी झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्यातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धाड गावाजवळ एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. भरधाव दुचाकी छत्रपती संभाजीनगरहून बुलढाण्याकडे जाणाऱ्या शिवशाही बसला धडकल्याने ही घटना घडली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघातात मृत पावलेले तरुण हे बुलढाणा तालुक्यातील ढाल सावंगी गावातील होते. कैलास दांडगे, रवी चंदनशिव आणि अंकुश पाडळे असे तिघांची नावे आहेत. तिन्ही तरुण हे विशीतील वयोगटातील होते. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या अपघातानंतर अपघातस्थळी मोठा जमाव झाला.

अन् अपघातस्थळी पोलीस तातडीने पोहोचले

महामार्गावर झालेल्या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघातस्थळी जमा झालेली गर्दी पोलिसांनी पांगवली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तरुणांचे मृतदेह ताब्यात रुग्णालयात पाठवले. यावेळी स्थानिक नागरिकांनी देखील पोलिसांना मदत केली. त्यानंतर पोलिसांनी वाहनधारकांची कोंडीतून सुटका केली. पोलिसांनी महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक कोंडी सुरळीत केली. या अपघातात तिघांच्या मृत्यूने ढाल सावंगी गावात शोककळा पसरली आहे.

बुलढाण्यात नेमका कुठे अपघात झालाय?

बुलढाण्यातील महामार्गावर अपघात झाला. त्यात तिघांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हातनुर धरणाचे ८ दरवाजे उघडले, तापी नदीमध्ये १७,०२२ क्युसेक

Mulshi Waterfall : ५ ते १० मिनिटांच्या ट्रेकनंतर दिसतो 'हा' धबधबा, मुळशीजवळ लपलंय सुंदर ठिकाण

Famous Actor : शूटिंगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्याला चावला विषारी किडा; रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती गंभीर

Pune Traffic Change: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Rain Alert : आजही मुसळधार पाऊस! पुण्यासह घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट; मुंबईत पावसाची काय स्थिती? वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT