Purna River  Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana Purna River News: भर उन्हाळ्यात पूर्णा नदीला पूर, नदीकाठच्या गावांना दिलासा

Buldhana Purna River News: अवकाळीमुळे शेतीपिकांचंही मोठं नुकसान झालं आहे.

संजय जाधव

Buldhana News: गेल्या आठवडाभरापासून राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. अवकाळीमुळे शेतीपिकांचंही मोठं नुकसान झालं आहे.

विदर्भातील अमरावती, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात आज अवकाळी जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे भर उन्हाळ्यात नदी नाल्यांना पूर आला आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातून उगम पावणाऱ्या पुर्ना नदीला पूर आला आहे.

शेगाव तालुक्यातील मुख्य जलवाहिनी असलेली पूर्णा नदी २० वर्षांनंतर पहिल्यांदाच मे महिन्यात वाहू लागल्याने नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णा नदी मे महिन्यात पूर्णतः आटलेली असते.

नदीकाठचे रहिवासी नदीपात्रात झरे खोदून त्यातील पाणी पिण्यासाठी आणतात. मात्र, यावर्षी अवकाळी पावसामुळे भर उन्हाळ्यात नदीला पूर आल्याने सर्वांना आनंद झाला. (Latest Marathi News)

पूर्णा नदी वाहू लागल्याने मनसगाव, पहूरपूर्णा, खातखेड, बोंडगाव, सगोडा, भास्तन, कालवड, कठोरा, डोलारखेड या परिसरातील जनावरांची सुद्धा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे. दुसरीकडे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळमध्ये राष्ट्रवादीला धक्का, बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

विद्यार्थ्याचं हैवानी कृत्य; ४० वर्षीय महिलेवर शेतात बलात्काराचा प्रयत्न, नकार देताच डोक्यात विळा घातला

Peacock Lifespan: किती वर्षे जिवंत राहतो भारताचा राष्ट्रीय पक्षी, उत्तर वाचून व्हाल थक्क

Dharmendra Health Update:ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली; कुटुंबातील सर्व सदस्य पोहोचले रुग्णालयात

Pani Puri Receipe: नेहमीचं चटपटीत पाणी सोडा, पाणीपुरीसाठी ५ मिनिटांत बनवा स्ट्रीट स्टाईल झणझणीत पाणी

SCROLL FOR NEXT