Congress News Saam Tv
महाराष्ट्र

Congress News : काँग्रेसच्या माजी आमदारावर दराेड्याचा गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Maharashtra News : चिखलीत काँग्रेसचे माजी आमदार यांनी तुफान राडा घातल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

संजय जाधव

Latest Buldhana News : चिखलीत काँग्रेसचे माजी आमदार राहुल बाेंद्रे यांनी तुफान राडा घातल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. माजी आमदार राहुल बाेंद्रेंसह समर्थकांनी भाजपच्या श्याम वाकदकरांना रस्त्यावरच मारहाण केली होती. या प्रकरणी आता राहुल बोंद्रे यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

बोंद्रे यांच्यासह त्यांच्या अन्य सहकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आले आहे. कलम 395, 397, 504, 506 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. बोंद्रे यांनी रस्त्यात अडवून वडीलांच्या विरोधात फेसबुकला पोस्ट का टाकली म्हणत केली मारहाण भाजपच्या (BJP) श्याम वाकदकरांना रस्त्यावरच मारहाण केली होती. इतकेच नाही तर गळ्यातील सोन्याची चैन, रुद्राक्षाची माळ आणि नगदी 5 हजार देखील हिसकवले असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे वडीलांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट वाकदकर यांनी समाज माध्यमातून (social media) केली होती. त्यामुळेच हा प्रकार घडला अशी चर्चा हाेती. दरम्यान स्वतः राहुल बोंद्रे यांनी याबाबत दुजोरा दिला आहे.

कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट खपवून घेतली जाणार नाही, आज थोडक्यात झाले, यानंतर परिणाम वाईट होतील असा इशारा ही माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी दिला. या घटनेनंतर वाकदकर यांना बुलडाणा (Buldhana) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेवरुन अद्याप काेणत्याही गटाकडून पाेलिसांत तक्रार दाखल झालेली नाही. दोन्ही गटांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान पाेलिसांनी राहुल बोंद्रे यांच्या कार्यालयाजवळ बंदोबस्त वाढविला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chocolate Pudding Recipe : नो शुगर, नो बेकिंग; घरीच १० मिनिटांत बनवा चॉकलेट पुडिंग, बच्चे कंपनी होईल खुश

Maharashtra Live News Update: अमरावतीत पाच किलो एमडी ड्रग्ज जप्त

Valentine Day Gifts: गर्लफ्रेंड किंवा बायकोला करा खूश; या व्हॅलेंटाईन डेला द्या 'हे' खास गिफ्ट्स

Hair Color Care: केसांना लावलेला रंग लगेच फिकट होतो? मग या 7 टिप्स करा फॉलो

Viral Video : आईचा गळा दाबला, बेदम मारहाण केली; पोटच्या मुलाचं संतापजनक कृत्य। पाहा Video

SCROLL FOR NEXT