Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : अवैध देशी दारू विक्रेत्यावर महिलांची धाड; पोलीसांकडून कारवाई होत नसल्याने महिला आक्रमक

संजय जाधव

बुलढाणा : गावात सुरु असलेल्या अवैध दारू विक्रीबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर देखील पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने गावातील महिला आक्रमक झाल्या. या संतप्त महिलांनी थेट दारू विक्रेत्यांच्या दुकानांवर धाड टाकत दारू विक्री बंद करण्यास सांगितले. 

बुलढाण्याच्या (Buldhana News) मेहेकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे अनेक दिवसापासून अवैध देशी दारू विक्री केल्या जात आहे. याबाबत अनेक तक्रारी साखरखेर्डा पोलिसात देण्यात आल्या होत्या. मात्र अद्याप पर्यंत पोलिसांनी कुठलीही कारवाई होत नसल्याने हिवरा आश्रम गावातील महिला आक्रमक झाल्या असून जिथे दारू विक्री केल्या जात आहे. तिथे जाऊन झडती घेत दारू विक्री करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवित असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

पोलिसांकडून अभय 
पोलीस (Police) प्रशासन अश्या अवैध दारू विक्री करणाऱ्यांना अभय देत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. हिवरा आश्रम येथे धार्मिक केंद्र आहे. गावाचा मोठा इतिहास आहे. मात्र याला काळिमा फासण्याचे काम दारू विक्रेते करीत असल्याची चर्चा सुज्ञ नागरिक करीत आहे. पोलिसांनी तातडीने हिवरा आश्रम परिसरातील सर्व अवैध दारू विक्री बंद करावी अन्यथा यापुढे महिला हातात कायदा घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : ठाकरे-शिंदे यांचे कार्यकर्ते आमनेसामने, कांदिवलीत तणाव

Shirdi Sai Baba Mandir : शिर्डीत साई भक्ताकडून हिरे जडीत सुवर्ण मुकुट दान, किंमत नेमकी किती?

Ajit Pawar News: 'दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय..', अजित पवारांनी पक्ष प्रवक्त्याला खडसावले; राष्ट्रवादीत अंतर्गत वाद उफाळला!

Apples : 'या' ट्रिकने कापलेला सफरचंद टिफीनमध्ये ठेवल्यावर काळा पडत नाही

Maharashtra Politics : सोलापूरात तणावाचं वातावरण; मराठा आंदोलकांनी अजित पवारांचा ताफा अडवला, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT