Buldhana News  Saam TV
महाराष्ट्र

राष्ट्रगीत सुरू झालं अन् अख्खी अंतयात्रा थांबली; बुलडाण्यात नेमकं काय घडलं?

अंतयात्रेचा कार्यक्रम थांबून काजेगाव ग्रामपंचायतसमोर समूह राष्ट्रगीत गायले गेले.

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव, साम टीव्ही

बुलडाणा : राज्यात आज सकाळी ११ वाजता सामूहिकपणे राष्ट्रगायन (National Anthem) झालं. राज्यभरातील अनेक नागरिकांनी आहे त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगायन म्हटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला बराच प्रतिसाद मिळाला. यादरम्यान, बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यात एक विशेष घटना पाहायला मिळाली. अंतयात्रेचा कार्यक्रम थांबून काजेगाव ग्रामपंचायतसमोर समूह राष्ट्रगीत गायले गेले. (Budhana Todays News)

जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल भागात असलेल्या काजेगाव येथील सुमनबाई काशीराम बोरणारे यांच वृद्धापकाळाने वयाच्या ८४ व्या वर्षी काल सायंकाळी निधन झालं. आज सकाळी त्यांचा अंत्यविधी सकाळी अकरा वाजता ठेवण्यात आला होता. सर्व नातेवाईक जमले होते.

अशातच सुमनबाई यांची अंतयात्रा त्यांच्या निवासस्थानावरून ग्रामपंचायतच्या दरम्यान अकरा ११ पोहोचली. तेव्हा राष्ट्रगीत गायनाची वेळ झाली. यावेळेस अंत्ययात्रेला उपस्थित असलेले पाहुण्यांनी सर्वानुमते निर्णय घेऊन अंत्ययात्रा ग्रामपंचायतसमोर ठेवून थांबून राष्ट्रगीत घेण्यात आले. या अनोख्या राष्ट्रभक्तीची जिल्ह्यात आज चर्चा होत आहे. (Budhana Todays News)

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमनबाई यांना राष्ट्रगीताविषयी नेहमीच आदर होता. त्या मागील कित्येक वर्षापासून १५ ऑगस्ट तसेच २६ जानेवारीला न चुकता ध्वजारोहणाकरिता शाळेत किंवा ग्रामपंचायतला हजर असत.

इतकंच नाही तर, त्या यानिमित्ताने लहान बालगोपाळांना साहित्य व खाऊ देऊन इतिहासाबद्दल माहिती सुद्धा द्यायच्या. आज काजेगाव वासियांनी राष्ट्रगीताच्या माध्यमातून दिलेली श्रद्धांजली ही खरंच आगळीवेगळी श्रद्धांजली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT