Unseasonal Rain  Saam tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने झोडपले; रब्बी पिकांचे व गुरांच्या चाऱ्याचे प्रचंड नुकसान

Buldhana News : हवामान विभागाकडून राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज सकाळपासून ढगाळ वातावरण

संजय जाधव

बुलढाणा : हवामान विभागाकडून राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तविण्यात आली आहे. आज (Buldhana) सकाळपासून ढगाळ वातावरण असून दुपारच्या सुमारास मोताळा तालुक्यातील काही भागात  हजेरी लावली आहे. यामुळे पिकांचे व चाऱ्याचे नुकसान झाले आहे. (Latest Marathi News)

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील आव्हा या गाव शिवारात आज दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली असून शिवारातील रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गहू, हरबरा, ज्वारी व मका पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. (Rain) अवकाळी पावसासोबत हवेचा जोर असल्याने शेतातील गहू पिक जमिनीवर झोपले. तसेच गुरांचा चाऱ्याचे सुद्धा नुकसान झाले असून शेतकरी (Farmer) वर्ग हवालदिल झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंचनामे करून भरपाईची मागणी 
मागील काळात याच गाव शिवारात प्रचंड नुकसान झाले होते. घरांची पडझड, गुरांची हानी झाली होती. आता पुन्हा अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे करुन मदत करण्याची युवासेना उप जिल्हा प्रमुख शुभम घोंगटे यांनी मागणी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

Bihar Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT