Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Electric Shock : घराचे बांधकाम करत असताना विद्युत तारेला स्पर्श; बांधकाम व्यवसायिकाचा मृत्यू

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे घराचे बांधकाम सुरु आहे. या घराच्या समोरून विद्युत लाईन गेली आहे.

संजय जाधव

बुलढाणा : घराचे बांधकाम करत असताना जवळून गेलेल्या विद्युत तारांना स्पर्श झाला. यात एका बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना (Buldhana) बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे घडली आहे.  (Tajya Batmya)

बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद (Jalgaon) तालुक्यातील सुनगाव येथे घराचे बांधकाम सुरु आहे. या घराच्या समोरून विद्युत लाईन गेली आहे. बांधकाम करत असताना बांधकाम ठेकेदार गणेश मिसाळ (वय ४२) यांचा तारेला स्पर्श झाला. (Electric Shock) तारेला स्पर्श झाल्याने मिसाळ हे फेकले गेले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रुग्णालयात नेले पण.. 

या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या गणेश मिसाळ यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

SCROLL FOR NEXT