Buldhana Tollnaka Collapsed Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana News: मलकापूर- सोलापूर महामार्गावरील टोलनाका कोसळला, ४ जण जखमी; वाहतूक ठप्प

Buldhana Tollnaka Collapsed: या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पण टोलनाक्यावर (Tollnaka) काम करणारे ४ कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेत अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहेत. तर या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

Priya More

संजय जाधव, बुलडाणा

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बुलडाण्यात (Buldhana) मोठे नुकसान झाले आहे. या वादळाचा फटका मलकापूर- सोलापूर महामार्गावरील टोलनाक्याला बसला आहे. दाताळा गावानजिक असलेला टोलनाका वादळी वाऱ्यामुळे कोसळला. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पण टोलनाक्यावर (Tollnaka) काम करणारे ४ कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेत अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहेत. तर या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी बुलडाण्यातील पासयन जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रात्री 8 वाजताच्या सुमारास मलकापूर - सोलापूर या महामार्गावरील टोलनाका कोसळला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा फटका या टोलनाक्याला बसला.

दाताळा गावानजीक असलेला बुलडाणा अर्बनचा टोलनाका या वादळाने कोसळला. यावेळी टोल वसूल करणारे कर्मचारी तिथे कार्यरत होते. या घटनेमध्ये ते जखमी झाले आहेत. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. हा टोलनाका कोसळल्याने या महामार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. महामार्गावरील वाहतूक बंद झाली असून वाहतूक कोंडी झाल्यामुळे चालकांचे हाल झाले आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे महामार्गावर सर्वत्र अंधार झाला आहे.

दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील विविध भागात आज पुन्हा मुसळधार पावसाला झाला. शेगाव शहरात विजांच्या कडकडाट आणि तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे मोठमोठी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली. अनेक ठिकाणी झाडे विद्युत तारांवर पडल्याने तारा तुटल्यात. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. या पावसामुळे उन्हाळी पिकांचेही मोठं नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT