बुलढाणा : विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक ठिकाणी वाद झाले होते. तर आता महायुतीच्या उमेदवारांकडून महाविकास आघाडी उमेदवारांच्या समर्थकांना धमक्या दिल्या जात आहेत.अशी तक्रार पोलीस अधीक्षकांकडे देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर अर्थात गेल्या दोन- तीन दिवसांपासून बुलढाणा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड यांच्याकडून (Mahavikas Aaghadi) महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्री शेळके यांच्या समर्थकांना धमकावत आहेत. अशी तक्रार आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. यामुळे (Buldhana) बुलढाणा मतदारसंघात राजकीय वातावरण तापल्याचे पाहण्यास मिळत आहे.
पोलिस सुरक्षा देण्याची मागणी
दरम्यान उद्या होणारी मतमोजणी शांततेत पार पडावी; यासाठी अधिकचा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात यावा. शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात यावेत आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस सुरक्षा देण्यात यावी; अशी मागणी यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.