Buldhana News ST bus accident in Mardadi Ghat 13 passengers injured Saam TV
महाराष्ट्र

Buldhana Bus Accident: बुलढाण्यात भीषण अपघात, मर्दडी घाटात एसटी बस उलटली; 13 प्रवासी जखमी

Buldhana ST Bus Accident: मलकापूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेली एसटी बस धाड रोडवरील मर्दडी घाटातील वळणावर उलटली.

Satish Daud

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana ST Bus Accident News

मलकापूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेली एसटी बस धाड रोडवरील मर्दडी घाटातील वळणावर उलटली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातात काही प्रवाशांना जबर मार लागला. त्यांना तातडीने उपचारासाठी धाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

अपघाताची ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात (Bus Accident) झाल्याची प्राथामिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी मलकापूर आगाराची बस पहाटेच्या सुमारास आगारातून निघाली.

या बसमधून १३ प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान, बस धाड रोडवरील मर्दडी घाटात (Budhana News) आली असता, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत उलटली. सुदैवाने दरीत झाडांची संख्या अधिक असल्याने बस खोल दरीत कोसळली नाही.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर काही जखमींना धाड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर

DK Rao Arrest : दाऊदचा कट्टर दुश्मन, गँगस्टर डीके रावच्या मुसक्या आवळल्या, कारण काय ?

Mouth Ulcer Symptoms: तोंड येण्यापुर्वी कोणती लक्षणे दिसतात?

'तु कोण आहेस रे? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर प्रहार, दिलं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

SCROLL FOR NEXT