Samruddhi Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg : बुलढाण्यात वाळू माफियांचा कहर; दोन ठिकाणी साईड बॅरिअर तोडून समृद्धी महामार्गावर अनधिकृत प्रवेश

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील रेती माफीयांची वक्र नजर महामार्गावर पडली आहे. एक्सेस कंट्रोल म्हणून तयार करण्यात आलेल्या या महामार्गाचे साईड बॅरियर तोडून रेती माफीयांनी महामार्गावर अनधिकृत एक्सेस मिळवला

संजय जाधव

बुलढाणा : तब्बल ६५ हजार कोटी रुपये खर्च करून नागपूर - मुंबई असा ७०१ किलोमीटरचा समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे. या महामार्गावर सुरक्षा व्यवस्था देखील तितकीच चोख करण्यात आली आहे. साईडने वाहनांचा प्रवेश टाळण्यासाठी साईड बॅरिअर लावले आहेत. मात्र हेच बॅरिअर तोडून वाळू माफियांनी समृद्धीवर अनधिकृत प्रवेश करत आहेत. यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे. 

नागपूर- मुंबई हा समृद्धी महामार्ग महत्वाकांक्षी असा प्रोजेक्ट मानला जातो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातला हा महामार्ग आता येत्या काही दिवसात पूर्णत्वास ही जात आहे. मात्र त्यापूर्वीच बुलढाणा जिल्ह्यातील रेती माफीयांची वक्र नजर या महामार्गावर पडली आहे. "एक्सेस कंट्रोल" म्हणून तयार करण्यात आलेल्या या महामार्गाचे साईड बॅरियर तोडून रेती माफीयांनी चक्क या महामार्गावर अनधिकृत एक्सेस मिळवला आहे. 

दोन ठिकाणांहून अनधिकृत प्रवेश 

खरंतर या महामार्गावरून प्रवास करण्यासाठी कुठल्याही वाहनाला अधिकृत टोलनाक्यावरूनच प्रवेश मिळतो. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर ते सिंदखेड राजा दरम्यान तळेगाव पुलाजवळ चेनेज ३२२ वर रेती माफीयांनी चक्क समृद्धी महामार्गाचे साईड बॅरिअर तोडून अवैधपणे समृद्धी महामार्गावर प्रवेश मिळवला आहे. यामुळे मात्र समृद्धी महामार्गावरून ताशी १२० किलोमीटरच्या वेगाने धावणाऱ्या वाहनाला अचानक रेतीचे डंपर दिसलं की चालक गोंधळतो आणि यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष 

समृद्धी महामार्ग पूर्ण होण्यापूर्वीच मोठे अपघात याठिकाणी झाले आहेत. यात अनेकांचा जीव आतापर्यंत गेले आहेत. मात्र समृद्धी महामार्गाचे साईड बॅरियर तोडून रेती माफिया ठिकाणावरून समृद्धी महामार्गावर आपली वाहने आणतात आणि जालना, संभाजीनगर येथे रेती तस्करी करतात. या प्रकाराबाबत अद्यापही बुलढाणा जिल्हा प्रशासनाचे लक्ष जात नाही. साईड बॅरियर तोडून समृद्धी महामार्गावर आपली वाहने आणत असल्यामुळे समृद्धी महामार्गाची सुरक्षा धोक्यात आल्याचे चित्र आहे. बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुका व मेहकर जवळ दोन ठिकाणी बॅरिअर तोडून नवीन मार्ग तयार करून समृद्धी महामार्गावर रेतीमाफीयांची वाहने सुसाट धावत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

अंगणाडी सेविकांना भाऊबीजेचं गिफ्ट! दिवाळीचा बोनस कधी मिळणार? आदिती तटकरेंनी थेट तारीख सांगितली

SCROLL FOR NEXT