Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News: धावत्या खाजगी बसमध्ये तरुण करताय मद्यपान; व्हिडिओ होतोय व्हायरल

धावत्या खाजगी बसमध्ये तरुण करताय मद्यपान; व्हिडिओ होतोय व्हायरल

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात २५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना ताजी असतानाच (Buldhana) बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या धावत्या ट्रॅव्हल्समध्ये मद्यपान करताना काही तरुणांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे खाजगी ट्रॅव्हल्सचा प्रवास कितपत सुरक्षित आहे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. (Breaking Marathi News)

अकोला जिल्ह्यातील पातुर येथून पुणेसाठी खासगी श्रेया ट्रॅव्हल्स ही नव्यानेच सुरू झाल्याची माहिती आहे. याच ट्रॅव्हल्समध्ये खामगाव ते चिखली दरम्यान चालकाच्या बाजूला केबिनमध्येच बसून चालकाचे चार ते पाच मित्र धावत्या ट्रॅव्हल्समध्ये मद्यपान करत असल्याचा व्हिडिओ एका प्रवाशाने आपल्या कॅमेरात कैद केले आहे. हा व्‍हीडीओ सध्‍या व्‍हायरल झाला आहे.

सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

खासगी बस चालक देखील मद्यपान केलेल्या स्थितीतच असल्याचा अंदाज काही प्रवाशांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा ट्रॅव्हल्स चालकासह मालकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला निश्चित, कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार?

Pitru Paksha : पितृपक्षात न चुकता करा पाण्याचे 'हे' ५ उपाय, पितर होतील प्रसन्न अन् मिळेल आशीर्वाद

Maharashtra News Live Update: देशी कांद्यांचे भाव वाढल्याने इजिप्तचा कांदा एपीएमसीमध्ये दाखल

Farmer Yojana : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आरोग्य सवलत योजना, डॉक्टर दाम्पत्याचा कौतुकास्पद प्रयत्न

Pooja Birari: बांदेकरांच्या सुनबाईंचा मराठमोळा थाट! गुलाबी नऊवारीत पूजा बिरारीचा खुलला लूक

SCROLL FOR NEXT