MVA  Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana: बुलडाण्यात महाविकास आघाडीला मोठं खिंडार! अनेक पदाधिकारी, सरपंचांचा भाजपात प्रवेश

Buldhana Politics: बुलडाण्यात महाविकास आघाडीला मोठं खिंडार पडलं आहे. अनेक पदाधिकाऱ्यांसह आजी- माजी सरपंचांनी राजीनामे देत भाजपात प्रवेश केला आहे.

Siddhi Hande

बुलडाण्यात महाविकास आघाडीला मोठी खिंडार पडत आहे. अनेक पदाधिकारांनी राजीनामे दिले आहेत. आपल्या पदाचे राजीनामे देत त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

चिखली विधान सभा मतदारसंघात आ. श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराला एक नवा आयाम मिळाला असून विधानसभा निवडणुकीतील सलग दुसऱ्या विजयानंतर आ.महाले यांच्या नेतृत्वाला अधिक लोकमान्यता मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

याशिवाय मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागात महाविकास आघाडी मधील काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (sp) या पक्षांना मोठे हादरे बसले आहेत. मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे प्रदेश सचिव संजय गाडेकर, यांच्या सुविद्य पत्नी व तेल्हारा ग्रामपंचायतच्या सरपंच किरणताई गाडेकर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर सोळंकी, काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष निलेश अंजनकर, प्रतिष्ठित व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते पंकज कोठारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

यासह बऱ्याच गावातील आजी - माजी सरपंच व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे . त्यामुळे जिल्हतातील महाविकास आघाडीला गळती लागल्याचे चित्र दिसत आहे.

अनेक पदाधिकारी, नेते आणि सरपंचांच्या भाजपमध्ये प्रवेशाने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यामुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे वर्चस्व संपुष्टात येऊ शकते. अनेकांनी उद्धव ठाकरे गट, शरद पवार आणि काँग्रेसची साथ सोडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT