Lumpy Disease
Lumpy Disease Saam tv
महाराष्ट्र

Lumpy Disease: बुलढाणा जिल्‍ह्यात लंपीने दगावली ३९९३ गुरे; ४१ हजाराहून गुरांना लागण

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील गुरांना लंपीची (Lumpy Disease) प्रचंड लागण झाली असून हा आजार आटोक्यात आणण्यात प्रशासनाला अद्यापपर्यंत यश मिळाले नसल्याचे दिसून आले आहे. राज्यात सर्वात जास्त गुरे दगावण्याचे प्रमाण (Buldhana) बुलढाणा जिल्ह्यात असून आतापर्यंत 3 हजार 993 गुरे लंपी आजाराने दगावली आहेत. तर मागील 4 महिन्यापासून आतापर्यंत 41 हजार 891 गुरांना लंपी आजाराने ग्रासले आहे. (Maharashtra News)

शेतकऱ्यांचे (Farmer) महत्‍त्‍वाचे धन म्हणजे गाय, बैल आहे. त्यांच्यावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. यावर्षी अगोदरच निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकरी उध्वस्त झाला असून आता लंपी आजाराने शेतकऱ्याजवळ असलेले पशुधन दगावत असल्याने बळीराजा प्रचंड आर्थिक अडचणीत आला आहे.

लसीकरणासाठी आवाहन

जिल्ह्यात लंपी आजारावर मात करण्यासाठी पशु संवर्धन विभाग सज्ज असून आतापर्यंत लसीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचा भास करित आहे. मात्र लंपी आजारावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला अद्यापपर्यंत यश मिळाले नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यात बुलढाणा जिल्ह्यात सर्वात जास्त गुरे दगावले असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पासुपालन धारकांनी आपल्या गुरांना लसीकरन करावे; असे आवाहन पशु संवर्धन सहायक आयुक्त डॉ. प्रवीण कुमार घुले यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Taiwan Earthquake News : ६.१ तीव्रतेच्या भूकंपाने तैवान पुन्हा हादरलं; नागरिकांमध्ये घबराट

Tharla Tar Mag: सायली अर्जुन खरे नवरा- बायको नाहीत...; चैतन्यने सांगितलं साक्षीला सत्य

Nashik Loksabha: नाशिक लोकसभेत नवा ट्वीस्ट! महंत अनिकेत शास्त्रीही निवडणुकीच्या रिंगणात; भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याचा दावा

Sambhajinagar News : अंबड टाकळी परिसरात सिलिंडरचा स्फोट, घर संसाराची राखरांगोळी

Today's Gold Silver Rate : सोन्याच्या भावात वाढ, चांदीची चकाकी उतरली; जाणून घ्या नवे दर

SCROLL FOR NEXT